Pune News : राज्यभरातील महिलांसाठी सरकारने चार योजना आणल्या आहेत. सर्वांचा विचार करणारे हे सरकार आहे. सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की, येत्या काळात पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा होतील. तर तुम्ही आमच्या सरकारला पुन्हा संधी दिली तर पुढच्या पाच वर्षांत 90 हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होतील.
हे पैसे भाऊबीज म्हणून दिले आहेत, हे पैसे कोणीच काढून घेणार नाही. त्यामुळे विरोधकांकडून पसरवलेल्या अफवांपासून दूर रहा. आतापर्यंत राज्यातील 1 कोटी 3 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले.
पुण्यात शनिवारी लाडक्या बहीण योजनेची सुरुवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित होते.
येत्या काळात आपल्याला सातत्या टिकवायचे आहे. ते तुमच्या हातात आहे. हे सातत्य टिकवते असताना पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला संधी द्या, पुन्हा आम्हाला पाठबळ द्या, आम्ही तुमच्या खात्यात पुन्हा एकदा 90 हजार रूपये देण्याचं काम करू, आम्ही शब्दांचे पक्के आहोत, आम्ही वेळ मारून नेणारे नाहीत. जे बोलतो ते करतो, असेही अजित पवार म्हणाले.
विरोधी पक्ष काही नसताना टीका करत आहेत. विरोधक फक्त बहिणीकडे लक्ष दिलं असे म्हणतात, मात्र भावाकडेही आम्ही लक्ष दिले आहे. यापुढे कुणीही लाईट भरू नये, कोण तुमची लाईट कट करायला येत तेच बघतो, हे भावासाठी केलं आहे. काहीजण कोर्टात गेले, पण कोर्टात टिकलं नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
एक कोटी तीन लाख फॉर्म जमा झाले आहेत. महिलांना सबळ करण्यासाठी ही योजना आणली आहे. आमच्या राजकीय जीवनातला आनंदाचा दिवस आजचा आहे. पुढेही या योजनेत सातत्य रहाणार आहे, पुढील पाच वर्ष या सर्व योजना पुढे चालू ठेवायच्या की नाही हे तुमच्या हातात असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.