पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 21 संचालक (Pune District Bank Election) पदांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बिनविरोध निवडणून गेले आहेत. तसेचे राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
या विषयी अजित पवार यांनी एका कार्यक्रमात भाष्य केले. ते म्हणाले, काही कार्यकर्त्यांच्या मनात असा प्रश्ना येत असेल की अजित पवारांना राष्ट्रवादीने व पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री केले तरी जिल्हा बँकेची हौस का फिटेना? दिलीप वळसे पाटलांना तर नंबर एकचे गृहमंत्री पद दिले. दत्तात्रय भरणे यांना राज्यमंत्री केले त्यानंतर पालकमंत्री सुद्धा केले. तरी त्यांची बॅंकेची हौस का फिटेना असा प्रश्ना तुनच्या मनात आला असेलच, असा सवाल अजित पवार यांनी केला.
त्यावर त्यांनी स्वतःच उत्तर दिले ते म्हणाले, या वेळी मी जिल्हा बॅंकेत स्वतः जाणार नव्हतो. पण माझे जे तिथले विरोधक आहेत ते म्हणाले दादा तुम्ही नसाल तर मग आम्ही माघार घेणार नाही. त्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याच्यामुळे मला ना इलाजाने अर्ज भरावा लागला. तुम्ही रमेश थोरात यांना विचारा अनेक दिवस मी जिल्हा बॅंकत जाऊ शकत नाही. कारण माझ्यावर राज्य सरकारची जबाबदारी आहे. म्हणून मला जागा अडवायची नव्हती. मात्र, काही जण तेथे असले तर कामकाज व्यवस्थीत चालते ती वस्तूस्तिती आहे. मी अर्ज भरल्यानंतर वळसे पाटील म्हणाले मीही अर्ज भरतो नाहीतर तेही अर्ज भरण्याच्या मनस्थितीत नव्हेत, असे पवार म्हणाले.
दरम्यान, दिलीप वळसे पाटील हे जवळपास १९९१ पासून जिल्हा बँकेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. तर दत्तात्रय भरणे मागील २५ वर्षांपासून बँकेचे संचालक आहेत. अजित पवारही १९९१ पासून बॅंकेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत अनेक वेळा बँकेचे अध्यक्षपदही पवार यांनी भूषवले आहे. मात्र, यावेळी पहिल्यांदाच पवार बिनविरोध निवडून गेले आहेत. बँक म्हणजे पुणे जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. बॅंकेच्या 21 संचालक पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. 2 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे, तर ४ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.