Laxman Jagtap| Ajit Pawar
Laxman Jagtap| Ajit Pawar sarkarnama
पुणे

अजित पवारांनी जपला भावनिक बंध; सर्व उद्घाटनं रद्द करत लक्ष्मण जगतापांच्या भेटीला

सरकारनामा ब्युरो

पिंपरी-चिंचवड : एकेकाळचे खंदे समर्थक आणि भाजपचे चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांची उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बाणेर येथील खाजगी रुग्णालयात जाऊन तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी आमदार जगताप यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेत विचारपूस केली.

आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडून केली जाणार होती. मात्र, आपले एकेकाळचे खंदे समर्थक व भाजपवासी झालेले लक्ष्मण जगताप यांची प्रकृती नाजूक असल्याची याची माहिती मिळताच अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व उद्घाटन कार्यक्रम अचानक रद्द केला आणि आमदार जगताप यांची भेट घेतली. महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात विकास कामात लक्ष्मण जगताप यांनी मोठी साथ दिली होती.

आमदार लक्ष्मण जगताप राष्ट्रवादीत असताना अजित पवारांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. याच नात्यातून मुंबईवरून पुण्यात येताना अजित पवार त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी थेट रुग्णालयात पोहचले. जगताप यांची प्रकृती अस्थिर असल्याने शहरात विकास कामांचा कोणताही कार्यक्रम करू नये, अशी सूचना अजित पवारांनी महापालिका प्रशासनाला दिली. त्यामुळेच आज पालिका कडून होणारे सर्व कार्यक्रम काल रात्री रद्द केले होते.

दरम्यान, गेल्या तीन-चार दिवसांपासून आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती.

लक्ष्मण जगताप यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आम्ही आता रुग्णालयामध्येच आहोत. जगताप यांच्यावर उपचार करणाऱ्या डॅाक्टरांशी बोलणे झाले आहे, असेही लांडगे यांनी सांगितले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच जगताप हे कार्यकर्त्यांच्या भेटीला पुन्हा येतील, अशी माहिती लांडगे यांनी दिली आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, की त्यांनी घरीच थांबावे, लक्ष्मणभाऊ यांची प्रकृती चांगली झाल्यानंतर ते कार्यकर्त्यांना भेटतील, असेही लांडगे यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT