<div class="paragraphs"><p>Ajit Pawar</p></div>

Ajit Pawar

 

sarkarnama

पुणे

अजित पवार म्हणाले, त्या दोघांनाही मी सांगत होतो पण ते हट्टालाच पेटले होते!

सरकारनामा ब्यूरो

बारामती : पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Pune District Bank Election) आज मतदान होत आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मतदान केले. त्यावेळी त्यांनी जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करुनही होत असलेल्या निवडणुकीवर भाष्य केले.

या वेळी अजित पवार यांनी हवलेतील निवडणुकीचे उदाहरण देत हौशी उमेदवारांना टोला लगावला. 'एक म्हणतो माझी पहिली संधी आहे आणि दुसरा म्हणतो ही माझी शेवटची संधी आहे. असे म्हणत ते निवडणुकीला उभे राहिलेत. त्यामुळे बिनविरोधसाठी मला यश आले नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

आम्हाला बिनविरोध जागा मिळण्यात यश आले. शिरूर आणि मुळशीची अ वर्ग जागेची निवडणूक होती. हवेलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे. तिथू दोन्ही आमच्याच विचाराची लोक आहेत. त्या दोघांनाही मी सांगत होतो पण दोघंही हट्टाला पेटले होते. एक म्हणायचा मला पहिल्यांदा संधी द्या व दुसरा म्हणायचा ही माझी शेवटची संधी आहे. दोघेही निवडणुकीत उभे राहिले. त्यामुळे तिथे बिनविरोधसाठी मला यश आले अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.

दोन महिला आणि क, ड वर्ग या निवडणुका आहेत. यात काही लोकांनी जातीयवाद करण्याचा प्रयत्न केला, तर कुणी पाहुण्यारावळ्याचा संबंध जोडण्याचा. मी एकटाच नाही, तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आम्ही सगळेच मिळून बँक चांगली चालवण्याचा प्रयत्न करत आहोत.

एक आहे सामान्य निवडणुकीत सोपे जाते. सर्वसामान्य लोकांना मताचा हक्क असतो. या निवडणुकीत मर्यादित लोकांना मताचा अधिकार असतो. त्यावेळी काही वेगळ्या प्रकारची प्रलोभणे दाखवली तर कधीकधी काहीजण बळी पडतात, असेही पवार म्हणाले. हवेली आणि पुणे शहराचा, पिंपरी चिंचवडचा विचार करता सर्वात जास्त मतदानात दुसरा क्रमांक बारामतीचा आहे. बारामतीत अ, ब, क, ड, ई अशा वेगवेगळ्या गटातीची जवळपास ७०० मते आहेत. आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला, आम्ही प्रयत्न केला. गेली ३० वर्षे आम्ही खूप चांगल्या प्रकारे बँक चालवतो. यावेळीही लोकांनी सहकार्य करावे, अशी आमची विनंती आहे, असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT