Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा धाकटा पुत्र जय पवार यांचा गुरुवारी (ता.10 एप्रिल) थाटामाटात साखरपुडा सोहळा पार पडला. या साखरपुड्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीयही उपस्थित होते. पण या सोहळ्यानंतर आता थोरले चिरंजीव असलेल्या पार्थ पवार यांचं लग्न कधी होणार याविषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र,अजित पवारांनीच (Ajit Pawar) या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचंही उत्तरही सांगून टाकलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी(ता.11) पुण्यात मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या लग्नाच्या चर्चांवरही भाष्य केलं. धाकटे चिरंजीव जय पवारांचा साखरपुडा पार पडल्यानंतर आता पार्थ पवारांचं कधी असाही प्रश्न त्यांना विचारण्यात येऊ लागला आहे. त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किल टिप्पणी केली.
पार्थ पवार हे जय पवारांपेक्षा मोठे आहेत.मग त्यांचं लग्न कधी? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले,'काय आहे ना,जयनं त्याचं लग्न ठरवलं.आता पार्थनं ठरवलं की, त्याचंही करू, या त्यांच्या उत्तरानं उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.
अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांचा फलटणचे प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांच्याशी साखरपुडा पार पडला.या सोहळ्याची सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओही शेअर करण्यात आले आहेत.या सोहळ्याला शरद पवारांसह खासदार सुप्रिया सुळे उपस्थित असल्याचे पाहायला मिळतेय.
विशेष म्हणजे साखरपुडा सोहळ्यासाठी आलेल्या शरद पवारांना घ्यायला गेटवर खुद्द अजित पवार पोहोचले होते. अजित पवार आणि पार्थ पवार यांनी शरद पवारांचं स्वागत केल्याचंही दिसून येत आहे. या सोहळ्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे आता पार्थ पवार यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील फुले वाड्याला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘फुले’ या जीवनपटावर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या चित्रपटावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,सेन्सॉर बोर्डामध्ये वेगवेगळे मान्यवर आहेत. समाजावर काही परिणाम होणार आहे का? याची शहानिशा केली जाते. संविधानानं स्वातंत्र्य दिलं आहे, लोकं काहीही बोलतात. चित्रपटातून कुठेही तेढ निर्माण होणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यामागचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणावर अजित पवारांनी भाष्य केलं. ते म्हणाले, 26/11 जेव्हा झालं, तेव्हा आम्ही सुद्धा मुंबईत होतो. मास्टरमाईंड कोण आहे याची चौकशी करण्यासाठी खूप प्रयत्न झाले. आता तपास होईल की, या माणसाने नेमकं काय काय केलं होतं, असंही स्पष्ट मत त्यांनी राणाच्या प्रत्यार्पणावर व्यक्त केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.