NCP NEWS Sarkarnama
पुणे

Ajit Pawar: सहानुभूतीसाठी तुम्ही कोर्टात गेला का? अजितदादांचा शरद पवारांना सवाल

Ajit Pawar Criticized Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे यांनीही "मुलीचा वाढदिवस कोर्टात साजरा करावा लागला," असे विधान केले आहे. या विधानांवर अजित पवारांनी उत्तर दिले आहे. याबाबत अजितदादांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Baramati News: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून बारामती विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार अशी काका-पुतण्याची लढत होत आहे.

राष्ट्रवादीच्या फूटीनंतरचा वाद कोर्टात सुरु आहे. निवडणूक प्रचारात अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील संघर्ष सभेत उमटत आहे.

काल (मंगळवार) सभेत "काही लोकांनी आमच्यावर खटला भरला. पक्ष आणि चिन्ह यासाठी ते कोर्टात गेले. त्यांच्यामुळे मला कोर्टाची पायरी चढावी लागली. कोर्टात माझ्या नावाने समन्स काढले. समन्स कधी पाहिल नव्हतं. यापूर्वी मी कोर्टात उभा राहिलो नाही. कोर्टानं निकाल दिला, पक्ष चिन्ह दुसऱ्याचे शरद पवारांचा काही संबंध नाही, असे कोर्ट म्हणाले. त्यानंतर पक्ष-चिन्ह दोन्ही गेलं. आम्हाला नवीन चिन्ह दिलं," असे शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही "मुलीचा वाढदिवस कोर्टात साजरा करावा लागला," असे विधान केले आहे. या विधानांवर अजित पवारांनी उत्तर दिले आहे. याबाबत अजितदादांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अजित पवार यांनी पवारांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला. "न्यायालयात प्रकरण सुरू आहे. तिथे जाऊन आपण काय करणार ? कोर्टात तुमच्या वतीने वकील भांडणार. माझ्यावतीने वकील भांडणार. वकील काय बोलतो ते आपण फक्त पाहायचे. मग सहानुभूतीसाठी तुम्ही कोर्टात गेला का?", असा सवाल अजितदादांनी पवारांना केला आहे. शरद पवारांना केला.

मी काय चूक केली?"

तुम्ही एकिकडे काय म्हणता जनतेच्या दारात जा. तुम्ही म्हणता न्याय व्यवस्थेकडे जा, न्याय व्यवस्था जो निर्णय देईल, मान्य करा. निवडणूक आयोग जो निर्णय देईल, ते मान्य करा. त्याच पद्धतीने आम्ही गेलो, आम्ही काय चूक केली?", असा उलट प्रश्न अजित पवारांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार

"मी काढलेल्या पक्ष माझ्याकडून काढून घेण्यात आला. केंद्राकडून पक्ष फोडण्याची चक्र फिरली. काही लोकांनी आमच्यावर खटला भरला. पक्ष आणि चिन्ह यासाठी ते कोर्टात गेले. कोर्टात माझ्या नावाने समन्स काढले. समन्स कधी पाहिल नव्हतं. यापूर्वी मी कोर्टात उभा राहिलो नाही. कोर्टानं निकाल दिला, पक्ष चिन्ह दुसऱ्याचे शरद पवारांचा काही संबंध नाही, असे कोर्ट म्हणाले. त्यानंतर पक्ष-चिन्ह दोन्ही गेलं. आम्हाला नवीन चिन्ह दिलं. तुम्हाला विनंती केली आमचे उमेदवार निवडून द्या,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT