Who is mahayuti cm candidate Sarkarnama
पुणे

Ajit Pawar: CM कोण होणार? अजित पवार म्हणाले, 'महायुतीचे सरकार आल्यानंतर...'

Who is mahayuti cm candidate in next maharashtra assembly election 2024: महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला. त्यांच्या विधानामुळे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे.

सरकारनामा ब्यूरो

विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहे. सध्या जागा वाटपावरुन सर्व राजकीय पक्षांमध्ये खल सुरु आहे. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण याची चर्चा महाविकास आघाडीत सुरु आहे. महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? यावर मात्र तीनही घटक पक्षातील नेते बोलण्याचे टाळत आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री कोण असेल, याबाबत केलेल्या विधानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे.

पुण्यातील वडगावशेरी मतदार संघामध्ये 300 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते झाले. वडगाव शेरी मतदारसंघातील येरवडा मध्यवर्ती इमारत, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय इमारत आणि जमावबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख इमारत या अशा तब्बल ३०६ कोटी ४१ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते झाले. महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत अहिल्याभवन इमारतीच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी देखील अजितदादांनी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

महायुतीतील तीनही घटक पक्ष सध्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करीत आहेत, असे असताना आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. माध्यमांशी बोलताना अजितदादांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान केले. महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? यावर ते म्हणाले, "महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कोण असेल ते आम्ही ठरवू.”

पुण्यात आज जीएसटी भवनच्या इमारतीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. येरवडा येथे वस्तू व सेवा कर भवन, नूतन प्रशासकीय इमारतीचे अजितदादांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून उद्घाटन झाले. जीएसटी भवनाच्या इमारतीची पाहणी करीत असताना त्यांना इमारतीच्या पहिल्या पायरीला सिमेंट साफ नसल्याने दिसले. ते पाहून अजित पवार अधिकाऱ्यांवर संतापले. त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'तुम्हाला इथं कशाला ठेवलेय? हे काय मला काढायला ठेवल का? असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना झापले.

वडगाव शेरी विधासभेचे आमदार सुनील टिंगरे, राज्य कर आयुक्त आशिष शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, विशेष राज्य कर आयुक्त अभय महाजन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अप्पर राज्य कर आयुक्त धनंजय आखाडे यावेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT