PM Narendra Modi Latest Marathi News, Ajit Pawar Latest news, devendra Fadnavis Latest News
PM Narendra Modi Latest Marathi News, Ajit Pawar Latest news, devendra Fadnavis Latest News Sarkarnama
पुणे

देहूतील कार्यक्रमवार अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, पण फक्त ६ वाक्यातच!

कल्याण पाचंगणे : सरकारनामा

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या देहू दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाषणावेळी राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचे समोर आले होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भाषणानंतर भाषणासाठी अजित पवार यांच्या नावाचा उल्लेखच करण्यात आला नाही. त्यावर पवार यांचे भाषण पंतप्रधान कार्यालयाने नाकारले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला पाहायला मिळाला.

दरम्यान आता या सगळ्या घडामोडींनंतर अजित पवार यांनी यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. बारामती येथे सायन्स अॅंड इनोव्हेशन अॅक्टीव्हिटी सेंटरच्या उद्धाटन कार्य़क्रमाच्या निमित्ताने आले असता पवार पत्रकारांशी बोलत होते. मात्र या प्रतिक्रियेत त्यांनी या घटनेला जास्त महत्व दिलेले नसून केवळ ६ वाक्यामध्ये मत मांडले आहे.

अजित पवार म्हणाले, देहु मधील कार्यक्रमाबाबत मला काहीही बोलायचे नाही. हा कार्यक्रम होऊन बरेच दिवस झाले. पंतप्रधान दिल्लीतही पोहचले. देहूत अतिशय चांगला कार्यक्रम झाला. देहू वारकरी संप्रदायातील अतिशय महत्वाचे ठिकाण आहे आणि पंतप्रधान या कार्यक्रमाला आले होते, याचे सर्वांना समाधान आहे.

काय झाले होते देहूमध्ये?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi हे मंगळवारी (१४ जून) महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते देहू जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमता देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर अजित पवार यांनी भाषण करणे अपेक्षित होते.

मात्र सुत्रसंचालकांनी थेट पंतप्रधान मोदी यांना भाषणासाठी आमंत्रित केले. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने पवार यांना भाषणासाठी परवानगी दिली नाही, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांचा अपमान झाला असून हा महाराष्ट्राचाही अपमान असल्याचे म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT