Indapur Banner Sarkarnama
पुणे

Video Dattatray Bharne : सुनेत्रा पवारांना शुभेच्छा; पण आमदार भरणेंचा फोटो गायब, इंदापुरात नेमकं काय घडलं?

Baramati Politics : लोकसभा निवडणुकीत त्यांनी सुनेत्रा पवारांसाठी इंदापुरात जोरदार काम केले. मतदानादिवशी त्यांच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याशी झालेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Sunil Balasaheb Dhumal

Indapur Political News : बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. त्यांच्या अभिनंदनासाठी ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे.

इंदापुरात मात्र अजित पवार गटाकडून लावलेल्या बॅनरवर आमदार दत्तात्रय भरणे यांचाच फोटो नसल्याने वादाची स्थिती झाली होती.

शरद पवारांची Sharad Pawar साथ सोडल्यानंतर अजित पवारांसोबत गेलेल्या पहिल्या फळीत आमदार दत्तात्रय भरणे होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सुनेत्रा पवारांसाठी इंदापुरात जोरदार काम केले. मतदानादिवशी त्यांच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याशी झालेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अजितदादांनीही त्यांची पाठराखण केली होती.

लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. तर सुप्रिया सुळे तब्बल दीड लाख मतांनी विजयी झाल्या. त्यांना इंदापुरातून 25 हजार 689 मतांचे लिड मिळाले आहे. यानंतर मात्र अजित पवार Ajit Pawar गटाकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. त्यांना मंत्रीपद मिळण्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या अभिनंदनासाठी इंदापूरमध्ये फलक लावले होते. त्यावर मात्र आमदार भरणेंना स्थान देण्यात आले नाही.

इंदापुरातील या फलकावर अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संसदेचा फोटो आहेत. मात्र आमदार दत्तात्रय भरणे यांचा फोटो नाही. यावरून इंदापुरातील वातावरण तापले. दरम्यान, चूक लक्षात येताच हे फलक काढण्यात आले. त्यानंतर आमदार भरणे Dattatray Bharne यांचा फोटोसह फलक लावण्यात येणार असल्याचे समजते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT