Ajit-Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar house news : अजितदादांच्या घराबाहेर जादूटोणा? खरात आणि सहकाऱ्यांवर शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांचा संशय

Ajit Pawar black magic controversy : अजित पवारांच्या घराबाहेर जादूटोण्याच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ. खरात आणि सहकाऱ्यांवर शरद पवार गटातील नेत्यांचा संशय.

Sudesh Mitkar

Pune News : स्वयंघोषित अंक शास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेले कॅप्टन अशोक खरात यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पेनड्राइव्हमध्ये ५८ व्हिडिओ सापडल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात आता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या SIT च्या प्रमुखपदी महिला IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एकीकडे प्रशासकीय पातळीवर तपास सुरू असतानाच दुसरीकडे या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चढताना पाहायला मिळत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.

या प्रकरणावर बोलताना माने म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती आणि मुंबईतील देवगिरी निवासस्थानाबाहेर जादूटोणा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टी सापडल्या होत्या. या सगळ्या गोष्टी कॅप्टन खरात आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी केल्या होत्या का? यांची चौकशी होणं आता आवश्यक आहे.

अजितदादा यांच्यावर जादूटोणा, मंत्र मारणं आणि काळी जादू करणे यासारखा काही प्रकार केला होता का? या सर्व गोष्टींचे चौकशी होणं आवश्यक आहे. अजित पवार यांच्या संदर्भात जे जे काही संशयाचे मुद्दे आहेत. या मध्ये कॅप्टन खरात आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. का? सर्व गोष्टींची चौकशी होणं अपेक्षित आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून महाराष्ट्र जादूटोणा कायद्या नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. कॅप्टन खरात यांच्यावर महिला अत्याचार या संदर्भातली चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये जादूटोण्याबाबतच्या गोष्टींचा देखील समावेश करून असा देखील तपास करणे आवश्यक आहे अशी मागणी सुनील माने यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT