Ajit Pawar inaugurates the Parshuram Vikas Mahamandal building moments before BJP MP Medha Kulkarni could arrive for the ceremony. sarkarnama
पुणे

Ajit Pawar Politics : भाजपचा खासदार येण्यापूर्वीच अजित पवारांनी उरकले उद्घाटन, महायुतीत नाराजीनाट्य?

Medha Kulkarni Ajit Pawar Inaugurates Parshuram Mahamandal Building : आपण येण्याआधीच उद्घाटन झाल्याने मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी अजित पवारांना मला काय माहीत तुम्ही येणार आहात असे सांगितले.

Roshan More

Mahayuti News : पुण्यामध्ये इमारतीच्या उद्घाटनामुळे महायुतीमध्ये नाराजी नाट्य पाहण्यास मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. उद्घाटनाची वेळ 6.30 ची ठरली होती. मात्र, त्यापूर्वीच अजित पवारांनी उद्घाटन केले. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी या पोहोचण्यापूर्वीच उद्घाटन झाल्याने त्यांनी तक्रारीचा सूर आळवला.

आपण येण्याआधीच उद्घाटन झाल्याने मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी अजित पवारांना मला काय माहीत तुम्ही येणार आहात असे म्हणत चला परत उद्घाटन करू, असे म्हटले. तसेच मेधा कुलकर्णी यांच्यासह पुन्हा इमारतीचे उद्घाटन केले.

महाराष्ट्र दिना निमित्त पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. ध्वजारोहणापूर्वीच अजित पवारांनी सकाळी विकासकामांचे उद्घाटन केले. परशुराम विकास महामंडळाच्या इमारतीच्या उद्घाटन केल्यानंतर त्यांनी सातच्या सुमारास सिंहगडरोडवरील उड्डापुलाचे उद्घाटन केले. यावेळी खासदार मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते.

पहाटेपासून कामाचा धडाका

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहाटेपासूनच आपल्या कामाला सुरुवात करतात. आज महाराष्ट्र दिनी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार होते. ध्वजारोहणाची वेळ सकाळी आठची होती. मात्र, त्यापूर्वीच अजित पवारांनी विकासकामांचा आढावा घेत परशूराम विकास महामंडळ आणि सिंहगडरोडवरील उड्डानपूलाचे उद्घाटन केले. 2021 मध्ये या उड्डानपूलाचे उद्घाटन झाले होते. सिंहगडरोडवर होणारी वाहतूक कोंडी या उड्डानपूलामुळे फूटणार आहे. तब्बल 61 कोटी रुपयांच्या निधीतून हा उड्डानपूल उभारण्यात आला आहे.

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

अजित पवारांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणारा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरू शेअर केला आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा ६५ वा वर्धापनदिन साजरा करत असताना, आज संपूर्ण महाराष्ट्रवासीयांना आणि महाराष्ट्रप्रेमींना अभिमान आहे की, आपली राजधानी मुंबई देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरली आहे आणि महाराष्ट्र हे सर्वात प्रगत, पुरोगामी व सुधारणावादी विचारांचं राज्य म्हणून ओळखलं जात आहे. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार अशा सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची घोडदौड कायम राखत असताना ‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा आपण दृढनिश्चय करूया.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT