Vijay Shivtare, Ajit Pawar,Uddhav Thackeray
Vijay Shivtare, Ajit Pawar,Uddhav Thackeray  Sarkarnama
पुणे

Shivtare Praised Ajit Pawar : विजय शिवतारेंकडून अजित पवारांचे कौतुक, तर उद्धव ठाकरेंना चिमटा

संतोष आटोळे

इंदापूर (जि. पुणे) : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) अस्वस्थ आहेत, हे खरे आहे. ते कर्तृत्ववान आहेत. मात्र, गेली अडीच-तीन वर्ष नेतेच घरात बसणार असतील तर ते अजित पवारांना कसे पटेल, असा टोला माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता लगावला. (Ajit Pawar is praised by Vijay Shivtare, Uddhav Thackeray is pinched)

बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती दौंड इंदापूर या तालुक्यात दौरा केल्यानंतर इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शिवतारे बोलत होते. यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे, पांडुरंग मेरगळ, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, शहराध्यक्ष अशोक देवकर यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले की, अजित पवारांसारखा माणूस शिंदे गटात सामील झाला तर त्यांचे स्वागतच करू. त्याचा परिणाम फक्त पुरंदरच नाही, तर संपूर्ण राज्याचे राजकीय चित्र पालटून जाईल. असे सांगत लोकसभेच्या उमेदवारीबाबत दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल.

इंदापूर, बारामती, पुरंदर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे राजकारणाचा अड्डा बनला आहे. गेल्या २० ते २५ वर्षे बाजार समितीवर सत्ता असणाऱ्यांना शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही, त्यामुळे इंदापूर बाजार समितीमध्ये सर्व पक्षांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून महारुद्र पाटील व अशोक घोगरे यांना संधी द्यावी. शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून बाजार समितीसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासनही शिवतारे यांनी दिले.

माजी मंत्री शिवतारे म्हणाले की, विरोधक विरोधाला विरोध म्हणून वज्रमूठसारखे उद्योग करत आहेत. ज्या चांगल्या योजना शिंदे-फडणवीस सरकार राबवत आहे, त्या लोकांपर्यंत पोहोचू नये; म्हणून असे संभ्रम निर्माण केले जात आहेत, असा आरोपही शिवतारे यांनी केला. शिवसेना-भाजप हे फेविकॉलसारखे एकत्र चिकटले असून यांच्यामध्ये वाद न होता, एकमेकांना पूरक राहून लोकांची, शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

मशिन बारामती यशस्वी करू

बारामती लोकसभा मतदारसंघातील एकाधिकारशाही संपवून मतदार संघात सर्वसामान्य जनतेची सत्ता आणण्यासाठी भाजप-शिवसेना एक जीवाने काम करेल आणि मिशन बारामती यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहील, असे विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT