Ajit pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Video : 'जशा बहिणी, तसेच भाऊ..दादासाठी सगळेच लाडके!', काय आहे अजित पवारांचा प्लॅन?

Ajit Pawar Ladki bahin yojana : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना ही विविध कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. आता दुसरीकडे मात्र तरुणांकडून आमच्यासाठी काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

Sudesh Mitkar

Pune News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना ही विविध कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. याच योजनेच्या भरवशावरती आगामी विधानसभा निवडणुका सर करण्याचं लक्ष महायुतीच्या मित्र पक्षांकडून करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. तिकडे लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील लाभार्थी महिला आनंदात असताना दुसरीकडे मात्र तरुणांकडून आमच्यासाठी काय? असा प्रश्न विचारला जात आहे याच प्रश्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan-sabha Election) दृष्टिकोनातून राज्य सरकारने अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा आणि अंमलबजावणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण, संविधानामध्ये बदल आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे महायुती सरकारची पीछे हाड झाल्याचे पाहायला मिळाली . त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीतील मित्र पक्षांकडून विविध रणनीती आखण्यात येत आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे दोन हप्ते सरकारने महिलांच्या खात्यात देखील जमा केले आहेत.

या लोकप्रिय योजनेचा जास्तीत जास्त वापर करून आगामी विधानसभा निवडणुकींमध्ये यश मिळवण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र यामध्ये कुठेतरी अजित पवारांनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ही योजना जाहीर केल्यानंतर अजित पवार यांच्या कडून पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये गुलाबी रंग ठळकपणे दिसत आहेत. याचं गुलाबी रंगाचा वापर करून निवडणुकीनंतर गुलाल उधळण्याची रणनीती अजित पवारांची (Ajit Pawar) असल्याचं दिसून आला आहे.

विविध योजनांच्या आधारे महिला मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी अजित पवारांकडून सोशल मीडियाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहेत. या योजनेवर आधारित विविध थीम साँग, सोशल मीडिया जाहिराती, पोस्टर या विविध माध्यमातून या योजनेचा जास्तीत जास्त प्रसार करून त्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये करण्यासाठी अजित पवारांची सोशल मीडिया टीम देखील कामाला लागली आहे.

एकीकडे राज्यातील महिलांसाठी विविध घोषणा होत असताना राज्यातील तरुण मात्र आमच्यासाठी काय? असा प्रश्न राज्य सरकारला विचारात आहे. त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी महाराष्ट्रवादी हेल्पलाइन सुरू करून केला आहे. याबाबत अजित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे त्यात अजित पवार म्हणतात, जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके! योजनांची नांदी जशी बहिणींसाठी.. तशीच भावांसाठी सुद्धा माझ्या भावांना विनंती करतो की, आमचा महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाइन क्रमांक - ९८६१७१७१७१ तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्रत्येक योजनेची माहिती सविस्तर मिळवा. लाभ घ्या, पंखांना बळ द्या! असे या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हणण्यात आले आहे. तसेच यासह एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये तरुण वर्गासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांची माहिती देखील देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT