Nana Kate, Raju Missal Sarkarnama
पुणे

Video Ajit Pawar: अजितदादांचा सावध पवित्रा; माजी नगरसेवकांसोबत खलबतं; पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षपदी मिसाळ की काटे?

Pimpri Chinchwad NCP President Will be Elected Today Raju Missal Nana Kate: भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे बैठकीला उपस्थित आहेत. माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Mangesh Mahale

Pimpri Chinchwad News : अजित पवार गटातील वीसहून अधिक नगरसेवकांनी काल शरद पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील पडझड रोखण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांची पुण्यात तातडीची बैठक सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षाची अजित पवार हे आजच निवड करणार असल्याचे समजते.

पुन्हा पक्षाला फटका नको म्हणून अजितदादा मैदानात उतरले आहेत. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे बैठकीला उपस्थित आहेत. माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटातील माजी महापौरासहित शेकडो कार्यकर्त्यांनी काल पुण्यात शरद पवार गटात प्रवेश केला. अजितदादांचा आणखी एक शिलेदार दीपक मानकर शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

शहरात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी विधान परिषद, मंत्रिमंडळ विस्तार महामंडळावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे.

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित गव्हाणे यांच्यासह माजी नगरसेवकांनी बुधवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

अजित पवार ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यामुळेच त्यांनी येत्या काळात होणारी फाटाफूट टाळण्यासाठी आज पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व माजी नगरसेवकांची बैठक बोलावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT