Atul Benke  sarkarnama
पुणे

Atul Benke : अजितदादांचा आमदार म्हणतो, 'पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या सोबत'

Atul Benke meet Sharad Pawar : माझी लढाई शरद पवारांच्या विरोधात आहे ,असे कृपया समजू नका. माझी लढाई कोणाच्या विरोधात नाही. लोकांच्या विकास कामांसाठी माझी लढाई आहे, असे अतुल बेनके म्हणाले.

Roshan More

Atul Benke News : जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आज (रविवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आमदार अतुल बेनके अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाला. मात्र, त्यावर अतुल बेनके यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

'पवार साहेब हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत. अजित पवार, सुप्रियाताई, पार्थ पवार, रोहित पवार हे आमचं कुटुंब आहे. आणि पुढे जात असताना राजकारणाच्य वाटा काही असल्या तरी पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे.', असे आमदार बेनके म्हणाले.

'माझी लढाई शरद पवारांच्या विरोधात आहे, असे कृपया समजू नका.माझी लढाई कोणाच्या विरोधात नाही. लोकांच्या विकास कामांसाठी माझी लढाई आहे. मी शरद पवार गटात प्रवेश करणार नाही. कृपया कुणी चुकीचा अर्थ काढू नये.', असे बेनके म्हणाले.

अमोल कोल्हेंसोबत काम करणार

डाॅ. अमोल कोल्हे यांना शिरूर जनतेने खासदार म्हणून निवडून दिले आहे. ते आधी खासदार असताना त्यांच्यासोबत काम करण्याचा मला अनुभव आहे. विकासकामासाठी आमदार म्हणून मी त्यांच्यासोबत असणार आहे.

अमोल कोल्हे पुढची पाच वर्ष खासदार असनार आहे आणि पुढची पाच वर्ष मी आमदार असणार आहे. राजकारणाच्या पलीकडे जुन्नर तालुक्यातील दोन लोक एकत्र येतात आणि तालुक्याचा विकास करतात हा आदर्श इतर तालुक्यांनीही घेवा,असे आवाहन अतुल बेनके यांनी केले.

बॅनर लावून शरद पवारांचे स्वागत

आमदार अतुल बेनके यांनी बॅनर लावून शरद पवारांचे स्वागत केले. यावर त्यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले, शरद पवार साहेब हे राजकीय कार्यक्रमासाठी आले नव्हते. मी बॅनर लावताना माझ्या पक्षाचे चिन्ह त्यावर लावलेले नाही. साहेब येणार तर त्यांचे स्वागत करणे हे माझे कर्तव्य आहे. मी कोणाचा संपर्कात नाही. पवार-बेनके कौटुंबीक नातं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT