Atul benke Sharad Pawar sarkarnama
पुणे

Atul benke : 9 मिनिट 51 सेकंदाच्या भाषणात अजितदादांचा आमदार म्हणतो, 'जिथे पवारसाहेब तेथे जास्त बोलायचं नसतं'

Atul benke Sharad Pawar : जुन्नर तालुक्यामध्ये अनेक पक्ष आहे. एकमेकांच्या विरोधात लढतात.पण या जुन्नर तालुक्यात कधीच द्वेषाचे राजकारण झाले नाही, असे अतुल बेनके म्हणाले.

Roshan More

Atul Benke News : जुन्नरचे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. जुन्नर मतदारसंघात आज (रविवारी) झालेल्या एका कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अतुल बेनके हे एकाच व्यासपीठावर होते. शरद पवारांच्या स्वागतासाठी बेनकेंनी बॅनर देखील लावले होते. मात्र, आपण शरद पवार गटात जाणार नसल्याचे स्पष्टीकरण बेनके यांनी दिले.

ओतूर येथे झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर शरद पवार हे होते. त्यावेळी आमदार बेनके यांनी 9 मिनिट 51 सेकेंदाचे भाषण केले. या भाषणाचा शेवट देखील बेनके यांनी खास स्टाईलने केला.

भाषणाचा समारोप करताना बेनके म्हणाले, 'प्रेम प्रेम हे प्रेम असतं प्रेम हे तराजूमध्ये तोलायचं मोजायचं नसतं. प्रेम प्रेम हे प्रेम असंत जिथे पवारसाहेब तिथे जास्त बोलायचं नसतं.' आपल्या संपूर्ण भाषणात बेनके यांनी पवारसाहेब यांचा उल्लेख करत सत्ता, साधन, संपत्ती याचा उपयोग हा लोकांसाठी करायचा असतो, याची शिकवण ही आदरणीय साहेब आणि माझ्या वडिलांनी दिली आहे, असे म्हटले.

बेनके म्हणाले, आपल्या आई बहि‍णींचे रक्षण करणारी पवार साहेबांनी दिलेली ती शपथ घेतली ती शपथ मी डायरीत लिहून ठेवली. साहेब या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक पक्ष आहे. एकमेकांच्या विरोधात लढतात.पण या जुन्नर तालुक्यात कधीच द्वेषाचे राजकारण झाले नाही. आम्ही होऊनही देणार नाही. निवडणूक आणि राजकारण संपल्यानंतर प्रेमाच्या भावनेने सर्व एकत्र येतात.

अमोल कोल्हेंसोबत काम करणार

मागील पंचवर्षिकमध्ये खासदार अमोल कोल्हे, मी विकासाठी कटिबद्ध राहिले.येथून पुढे अमोल कोल्हे यांच्यासोबत जाण्यासाठी कटिबद्ध आहे. विकासासाठी कटिबद्ध आहे, असे म्हणत बेनके यांनी जुन्नरच्या विकासाठी कोल्हे यांच्या सोबत काम करणार असल्याचे म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT