Rupali Patil Thombre addressing media after filing a police complaint against viral defamatory videos involving Ajit Pawar and Rupali Chakankar Maharashtra politics controversy. Sarkarnama
पुणे

NCP Politics : 'महिला आयोगाच्या अध्यक्षाच सुरक्षित नसतील तर...'; चाकणकर अन् अजितदादांच्या बदनामीकारक व्हिडिओचे पुरावे देत रूपाली ठोंबरेंनी केली मोठी मागणी

Rupali Patil Thombre vs Rupali Chakankar : गेल्या दोन दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Sudesh Mitkar

Pune News, 02 Oct : गेल्या दोन दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

दोन दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास रुपाली ठोंबरे यांची बहीण प्रिया सुर्यवंशी, वैशाली पाटील, पूनम गुंजाळ आणि अमित सुर्यवंशी या चौघांनी माधवी खंडाळकर या महिलेला मारहाण केली. त्या प्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र रुपाली चाकणकर यांच्या सांगण्यावरून माधवी खंडाळकर आपल्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप रूपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे.

हा वाद सुरू असतानाच रूपाली ठोंबरे यांनी आज सोशल मीडियावर एक नवीन पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रूपाली चाकणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर काही चुकीच्या पद्धतीने एडिट करून व्हिडिओ पसरवण्यात येत असून त्यांच्यावर गुन्हे नोंद करावी अशी मागणी केली आहे.

यावेळी त्यांनी काही सोशल मीडिया अकाउंट्सचा दाखला देत यावर अजित पवार आणि चाकणकर यांच्याबाबत कशा पद्धतीने चुकीचे व्हिडिओ बनवण्यात आले असल्याचा उल्लेख केला आहे. याबाबत रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, राज्य महिला आयोग महिलांच्या सुरक्षेसाठी, सक्षमतेसाठी, मनोबल वाढण्यासाठी आहे.

पण जे महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वतःला सुरक्षित ठेवू शकत नाही ते महाराष्ट्रातील माता-भगिनींना कशा सुरक्षित ठेवू शकतील? असा सवाल त्यांनी केला. महिला आयोगाच्या अध्यक्षांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सोशल मीडियावर जर बदनामीकारक व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात येत असतील तर महिला आयोगाने स्वतःहून तातडीने गुन्हे दाखल करणे गरजेचे होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या प्रतिष्ठेला सोशल मीडियावर व्हिडिओ करून बदनामी करणाऱ्यांवर, बदनामी पोस्ट करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. राज्य महिला आयोगाच्या विभागाची पत, प्रतिष्ठा टिकली पाहिजे. सोशल मीडियाच्या विकृतीवर बदनामी करणाऱ्या व्हिडिओ, पोस्टवर तातडीने गुन्हे दाखल आवश्यक असल्याने त्याबाबत खडक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज दिला असल्याचेही रूपाली पाटील यांनी सांगितले.

या पोस्टसोबत रूपाली पाटील ठोंबरे यांनी खडक पोलीस स्टेशनला दिलेले तक्रार अर्ज जोडला आहे. मध्ये दोन इंस्टाग्राम आयडीचा उल्लेख करण्यात आला असून ज्यामध्ये अजित पवार यांच्याबाबत तुच्छ आणि बदनामीकारक व्हॉइस ओव्हर व्हिडिओ चाकणकरांसोबत लिंक करून अपलोड करण्यात आला असल्याचा नमूद केलं आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकून संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी त्यांनी या अर्जाद्वारे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT