Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar: नव्यांना मानाचे पान, निष्ठावंतांकडे दुर्लक्ष? राष्ट्रवादीचे माजी आमदार नाराज

Ajit Pawar NCP Ex-MLAs Upset:राष्ट्रवादी पक्षात नव्याने प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी- नेत्यांना मानाचे पान दिले जाते, तर ज्यांनी पक्षाच्या कठीण काळात समर्थपणे साथ दिली, अशा जुन्या नेत्यांना डावलले जात असल्याचे चित्र आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Mangesh Mahale

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील ज्येष्ठ नेते, आमदार भास्कर जाधव नाराज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी आमदार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षात अनेक वर्ष काम करीत आहोत, पण आम्हाला अद्याप कुठलीही जबाबदारी दिली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

देवेंद्र भुयार, दिलीप मोहीते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब आजबे, अतुल बेनके, सुनील टिंगरे हे माजी आमदार पक्षातील कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे समजते. पक्षाकडून कुठलीही जबाबदारी दिली जात नाही, कुठल्याही बैठकीला बोलावले जात नाही, अशी त्यांची तक्रार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

यानिमित्ताने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे. राष्ट्रवादी पक्षात नव्याने प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी- नेत्यांना मानाचे पान दिले जाते, तर ज्यांनी पक्षाच्या कठीण काळात समर्थपणे साथ दिली, अशा जुन्या नेत्यांना डावलले जात असल्याचे चित्र आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

आम्हाला मान दिला जात नाही, बैठकींना बोलवण्यात येत नाही, अशी खंत माजी आमदारांनी व्यक्त केली आहे.पक्षाच्या अडीअडचणीच्या काळात आम्ही पक्षाच्या सोबत होतो, तरीही अशी वागणूक का? असा सवाल ते विचारीत आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. पक्षाचे सहा माजी आमदार पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT