ajit pawar (7).jpg sarkarnama
पुणे

Video Ajit Pawar : हौसे, नवसे, गवसे येतील, विश्वास ठेवू नका; बारामतीतून अजित पवारांचा रोख कुणाकडे?

Akshay Sabale

लोकसभेला आलेल्या अपयशानंतर आगामी विधानसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला उभारी देण्याच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रणनीती आखली आहे. त्यापार्श्वभूमीवर 'जनसन्मान रॅली' या नावानं राष्ट्रवादीकडून बारामतीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

तेव्हा अजित पवार यांनी हौसे, नवसे, गवसे येतील म्हणत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तसेच, पुन्हा एकदा महायुती सरकारला निवडून देण्याचं आवाहन केलं. यावेळी पावसानं हजेरी लावल्यानं कार्यकर्त्यांमध्ये एकच धावपळ उडाली. कार्यकर्त खुर्च्यां डोक्यावर घेऊन अजित पवार यांचं भाषण ऐकत होते.

अजित पवार म्हणाले, "अडीच लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या सर्व महिलांना 'लाडकी बहीण योजने'चा फायदा मिळणार आहे. तीन गॅस सिलेंडरचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. बारामतीतील महिलांना 'लाडकी बहीण योजने'साठी वर्षांला 180 कोटी रूपये मिळणार आहेत. महाराष्ट्रात 'लाडकी बहीण योजने'साठी 46 हजार कोटी रूपये मिळणार आहेत. काही-काही राज्यांचे बजेट एवढे नाहीत."

"महिला सक्षम आणि आत्मनिर्भर होण्यासाठी 'लाडकी बहीण योजने'तून वर्षांला 18 हजार रूपये देण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे. पण, त्यासाठी विधानसभा निवडणुकीत महायुतीला निवडून द्यायचं आहे. तर, 'लाडकी बहीण योजना' पुढे चालणार आहे. हौसे, नवसे, गवसे येतील, काही सांगण्याचा प्रयत्न करतील, विश्वास ठेवून नका. हा अजितदादा शब्दांचा पक्का आहे. त्यात कुठेही बदलणार नाही," असं अजित पवार यांनी म्हटलं.

"44 लाख शेतकऱ्यांचे 14 हजार कोटी माफ केले आहेत. महावितरणचे कोणताही अधिकारी वीज बिल भरा म्हणून सांगण्यास येणार नाहीत. पीक, धान्य, फळे चांगल्या प्रकारे पिकवा. 1 रूपयांत सरकार पिकविमा देत आहे. शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के व्याजानं पिककर्ज सरकारनं दिलं आहे," असं अजित पवार यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT