Ajit Pawar On Sanjay Raut : Sarkarnama
पुणे

Ajit Pawar On Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले, '१५ दिवसात सरकार कोसळणार' तर अजित पवार म्हणतात..

Sanjay Raut News : "संजय राऊत आणि माझी भेट झाली होती.."

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar On Sanjay Raut Statement : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे आज ( २३ एप्रिल ) शिवसेना ठाकरे गटाची वज्रमूठ सभा पार पडत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तोफ जळगावात धडाडणार आहे. या सभेसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ही सभेच्या तयारीसाठी संजय राऊत (Sanjya Raut) दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. या दरम्यान त्यांनी १५ दिवसांत सरकार कोसळणार असल्याचा मोठा दावा केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले ?

“महाराष्ट्राचलं सद्याचं सरकारच भ्रष्ट आहे. पुढच्या पंधरा दिवसांमध्ये सरकार निश्चित कोसळणार आहे. सरकारचं ‘डेथ वॉरंट’ तयार आहे. फक्त त्यावर सही होणे, बाकी आहे. पुष्पचक्र अर्पण करा,” असं म्हणत राऊतांनी शिंदे-फडणवीसांवर जहरी टीका केली आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

पुढच्या पंधरा दिवसांमध्ये सरकार कोसळणार असल्याचा मोठा दावा राऊतांनी केला आहे, राऊतांच्या या दाव्याबद्दल विचारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “ यावर मला काहीही भाष्य करायचं नाही. नागपूरमधून येत असताना संजय राऊत आणि माझी भेट झाली होती. मात्र यानंतर आमची प्रत्यक्ष वा फोनवर कसलीही चर्चा झाली नाही. राऊतांनी कोणत्या आधारे हे वक्तव्य केले, याची आपल्याला माहिती नाही. अनेकजण अशी वक्तव्यं करत असतात. यामुळे राऊतांच्या या वक्तव्याची आपल्याकजडे काही माहिती नाही, यावर मी काय बोलू, असं अजित पवारांनी म्हटलं.

मुंबई नियोजित वज्रमूठ सभेला अजूनही परवानगी मिळू शकलेली नाही. यासंदर्भात प्रश्न विचारले असता अजित पवारांनी सांगितले की, “उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे, मी स्वत: लक्ष घालून यासंदर्भात परवानगी मिळवून घेतो. नागपूरमधील ‘वज्रमूठ’ सभेला देखील परवानगीसाठी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. संविधानातील दिलेल्या अधिकाराचा वापर करून प्रत्येकाला आपल्या सभा घेता येतात. फक्त सभेत घेताना, फक्त सभेत कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही,” असे अजित पवारांनी म्हंटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT