Ajit Pawar On SC Verdict : Ajit Pawar On Supreme Court Verdict :
Ajit Pawar On SC Verdict : Ajit Pawar On Supreme Court Verdict : Sarkarnama
पुणे

Ajit Pawar On SC Verdict : 'रात्री जे बोललो, तसंच घडलं' ; सत्तासंघर्षाच्या निकालावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया..

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar On Supreme Court Verdict : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. राज्यपाल यांच्या निर्णयावर ताशेरे ओढताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही ठाकरेचं सरकार पूर्वरत केलं असतं, असे न्यायालयाने म्हंटले आहे. त्यामुळेच राज्यात आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

सत्तासंघर्षावर न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर टीका टिपण्णी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र विरोधीपक्ष नेते अजित पवार यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज पुणे विमानतळावर आगमन होताच, अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

न्यायालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया विचारले असता, नो कमेंट अशी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी फार आग्रह केल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "मला जो पर्यंत निकालपत्र वाचायला मिळत नाही, तोपर्यंत यावर मी काहीच सांगू शकणार नाही. मला याबाबत जे काही बोलायचं होतं, ते मी रात्रीच लातूरमध्ये असताना बोललो आहे आणि तसंच घडलं."

मला याबाबत आता सविस्तर माहिती घेऊ द्या. व्यवस्थित माहिती घेतल्याशिवाय मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, असे म्हणत अजित पवार त्यांच्या वाहनातून जाताना, शेवटी एक वाक्य म्हणाले. "फक्त मी दिल्लीला गेलो नाही एवढं सांगा,” असं म्हणत ते निघून गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT