AAIB investigation into the cause of Learjet 45 crash 2026 Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास वेगाने सुरू, दिल्लीत ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हर करण्यास सुरूवात

Ajit Pawar plane crash black box analysis in Delhi. : विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजेच ब्लॅक बॉक्स-दिल्लीतील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. येथे डेटा रिकव्हर आणि विश्लेषण सुरू झाले आहे. या स्तरात विमानाचा वेग, उंची, इंजिन तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, वैमानिकांमधील संभाषणे आणि इतर महत्त्वाच्या तांत्रिक माहिती संकलित केली जाईल.

Sudesh Mitkar

Pune News, 05 Feb: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कडून वेगाने सुरू झाला आहे. 28 जानेवारीला मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ लिअरजेट 45 विमान कोसळले होते. या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता.

या अपघाताबाबत विविध शंका उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष या अपघाताच्या चौकशी करायला लागले आहे. अशातच AAIB ने अपघाताचे तपास तीन स्तरांमध्ये (थ्री लेअर) विभागले असून, प्रत्येक स्तरावर सखोल काम सुरू आहे.

पहिला स्तर – साइट इन्व्हेस्टिगेशन आणि ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हरी

घटनास्थळावरील तपास पूर्ण झाला असून, विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजेच ब्लॅक बॉक्स-दिल्लीतील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. येथे डेटा रिकव्हर आणि विश्लेषण सुरू झाले आहे. या स्तरात विमानाचा वेग, उंची, इंजिन तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, वैमानिकांमधील संभाषणे आणि इतर महत्त्वाच्या तांत्रिक माहिती संकलित केली जाईल.

त्यानंतर दुसऱ्या स्थरात अवशेषांचे प्रयोगशाळा विश्लेषण केले जाईल. विमानाचे अवशेष गोळा करून मुंबई किंवा दिल्लीतील प्रयोगशाळेत पाठवले जातील. येथे भागांचे मायक्रोस्कोपिक परीक्षण, मटेरियल फेल्युअर, इंजिन किंवा नियंत्रण प्रणालीतील बिघाड यांचे सखोल विश्लेषण होईल. आणि तिसरा स्थरात अहवाल सादरीकरण होणार आहे. प्राथमिक अहवाल सादर केला जाणार आहे.

अंतिम अहवालासाठी मात्र काही महिने लागू शकतात. AAIB च्या अंतिम अहवालानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान प्राथमिक अहवालाबाबतच्या काही बाबी समोर येत आहे. त्यानुसार विमान लँडिंगसाठी धावपट्टीकडे जात असताना कमी दृश्यमानता आणि तांत्रिक बिघाड यामुळे नियंत्रण गमावले गेले असावे.

पहिल्या लँडिंग प्रयत्नात अपयश आल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमानाचा लँडिंग अँगल चुकला आणि ते धावपट्टीच्या बाजूला शेतात कोसळले, ज्यामुळे भीषण स्फोट आणि आग लागली. वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज आला नसावा किंवा इंजिन/नियंत्रण प्रणालीत शेवटच्या क्षणी समस्या उद्भवली असावी, असा प्राथमिक संशय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT