Ajit Pawar Plane Carsh Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Plane Carsh: 45 सेकंदांमध्ये काय झाले! अजितदादांच्या विमान अपघाताचा CCTV फुटेज समोर

Ajit Pawar plane crash CCTV : मुंबईहून अजितदादा घेऊन निघालेल्या विमानाने सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी बारामतीकडे टेकऑफ केले होते. तर, बारामतीमध्ये 8 वाजून 50 मिनिटांनी विमानाचे लँडिंग होणार होते. मात्र, विमान 40 मिनिटांत बारामती विमानतळाजवळ पोहोचलं होतं. यावेळी लँडिंग करत असताना अखेरच्या क्षणी हा अपघात झाला.

Mangesh Mahale

Ajit Pawar Baramati Plane Carsh Update : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हा अपघात किती भीषण होता, याची कल्पना येते.

आज सकाळी मुंबईहून विमानाने अजितदादा बारामतीकडे निघाले होते. मुंबईहून उड्डाण केल्यानंतर एक तासाने बारामती सकाळी 8 वाजून 36 मिनिटांनी ही घटना घडली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या चार सभा होत्या.

सभेसाठी ते बारामती येत होते. विमान लँडिंगसाठी केवळ 40 ते 45 सेकंदांचा वेळ शिल्लक राहिला असताना होत्याचं नव्हतं झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 5 जणांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला.

मुंबईहून अजितदादा घेऊन निघालेल्या विमानाने सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी बारामतीकडे टेकऑफ केले होते. तर, बारामतीमध्ये 8 वाजून 50 मिनिटांनी विमानाचे लँडिंग होणार होते. मात्र, विमान 40 मिनिटांत बारामती विमानतळाजवळ पोहोचलं होतं. यावेळी लँडिंग करत असताना अखेरच्या क्षणी हा अपघात झाला.

सुरक्षित ठिकाणी विमान लँडिंग करण्यासाठी पायलटने प्रयत्न केला. पण नियतीच्या मनात वेगळे होते. विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन कोसळले. मोठा जाळ अन् धुराचे लोट परिसरात दिसत होते,

लँडिंसाठी केवळ 45 सेकंदांचा वेळ शिल्लक असताना विमान अचानक रडारवरून गायब झाल्याचे सांगितले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 5 जणांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला.

खाजगी VSR कंपनीचे विमान होते. विमानात अजितदादा, मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता. या सगळ्याचा यात अपघातात मृत्यू झाला. आग आणि धुराच्या लोटात विमान जळून खाक होत असताना परिसरातील ग्रामस्थानी तेथे गर्दी केली. नेमके काय झाले हे काही काळ त्यांच्या लक्षात आले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT