Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Last Rites: चारच दिवसांमध्ये अजितदादांनी केलेलं विधान खरं ठरलं! त्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

Ajit Pawar speech video viral : ‘कोण कायमचं राहणार आहे? तुम्ही -आम्ही आज असू उद्या नसू, काळाचं नितीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे. परंतु आपण आपल्या हयातीमध्ये काम करत असताना, राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये.

Mangesh Mahale

Ajit Pawar Death: महाराष्ट्रातील राजकारणातील 'दादा' माणूस असलेले अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार होत आहे. अशातच अजितदादांचा चार दिवसापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काल (बुधवारी) विमान अपघातात अजितदादांनी अकाली एक्झिट सर्वांच्या मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यांच्या निधनाने राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. चार दिवसापूर्वी त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेल विधानं यानिमित्ताने आठवत आहे. तो व्हिडिओ पाहून अनेकांना अश्रू अनावर होत आहे.

"काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं, तुम्ही -आम्ही आज असू उद्या नसू, काळाचं नितीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे," असं अजित पवार यांनी म्हटलं होतं, यानंतर चारच दिवसांमध्ये विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यांच्या त्या भाषणाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

काय म्हटलं होते अजितदादांनी...

‘कोण कायमचं राहणार आहे? तुम्ही -आम्ही आज असू उद्या नसू, काळाचं नितीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे. परंतु आपण आपल्या हयातीमध्ये काम करत असताना, राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं, निवडणुका संपल्यानंतर राजकारण विसरायचं असतं. पण ज्याच्यामधून त्या भागात आर्थिक सुबत्ता येणार आहे, ते काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. मित्रांनो हे जग कायमचं राहणार आहे, तुम्ही आम्ही आज,असू उदया नसू, असं त्यांनी म्हटलं होतं.

अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील अजितदादांचे सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी, पवार कुटुंबिय अन् लाखोंचा जनसमुदाय उपस्थित आहेत. थोड्याच वेळात त्याच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर 'अजितदादा अमर रहे!'च्या घोषणा कार्यकर्ते देत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT