Pune Mahapalika : पुणे शहरामध्ये निधीची कमतरता नसतानाही नियोजनबद्ध विकास झालेला नाही. पुणेकरांना सोयीसुविधा देण्यास सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. भाजपची एकहाती सत्ता असल्याने त्यांनी लॉन्ग टर्मचा विचार करून नियोजनबद्ध कारभार करणे आवश्यक होतं. मात्र तसं झालं नाही, त्यामुळे पुण्यातील नागरी समस्या खूप जास्त प्रमाणात वाढल्या आहेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सत्तेत मित्रपक्ष असलेल्या भाजपवर सडकून टीका केली.
राज्यात एकत्र सत्तेत असलेले महायुतीतील मित्रपक्ष पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आमने-सामने आले आहेत. गुरुवारी आणि शुक्रवारी असे सलग दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये सभा आणि पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्यानंतर शनिवारी त्यांनी पुणे शहराकडे मोर्चा वळवला. संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर या सगळ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
अजित पवार म्हणाले, नवले ब्रिजच काही बोलायला नको, सिंहगड रोडवरील फ्लायओवरचे काम चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने आता तिथे तोडफोड करावी लागणार आहे. पुण्यातील कारभारी लोक कमी पडली म्हणून पुण्यातील रस्त्यावर खड्डे पडले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुण्याचे शिल्पकार म्हणतात त्यांनी उत्तर दिलं पाहिजे, असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला.
नियोजनशून्य कारभार असल्यामुळे पुण्यात पाणी प्रश्न निर्माण होतोय, नाकर्तेपणामुळे पुण्यावर अशी वेळ आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्या पद्धतीने पूर्वी कारभारी बदला अशी हाक दिली होती त्याच पद्धतीने आता देखील पुणेकरांनी कारभारी बदलण्याची वेळ आली आहे. जे भाजपचं त्रिकूट आहे त्याला पुण्यातील सत्तेपासून दूर करण्याची वेळ आली असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितलं.
भाजपचे त्रिकूट म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे खासदार मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यावर टीका केली असल्याचं बोलत जात आहे. पत्रकारांनी त्रिकूट कोण विचारलं असता मी त्यांचं नाव घेणार नाही मात्र तुम्ही हुशार आहात तुम्हाला ते त्रिकूट कोण आहे हे माहिती आहे असं अजित पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.