Ajit Pawar
 Ajit Pawar sarkarnama
पुणे

तीन सदस्य प्रभागाच्या निर्णयावर अजितदादा म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडी एकवाक्यता नसल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर तीन सदस्यीय प्रभाग रचना होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तीन सदस्यीय प्रभाग रचनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज (ajit pawar) असल्याची चर्चा होती. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, ''प्रभाग कितीचाही असला तरी विकासकामे झाली पाहिजे. प्रभाग सदस्य संख्येबाबत पक्षाच्या वेगळ्या भूमिका असू शकतात. प्रत्येक ठिकाणची रचना वेगळी असू शकते. मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत तीन सदस्ययीय प्रभागाचा निर्णय अंतिम झाला आहे.''

अजित पवार म्हणाले, ''पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांकडून नियमाचं सर्रास उल्लंघन होत आहेत. प्रशासनाने केलेले पाहणीत याबाबतची माहिती समोर आली आहे. ज्या व्यक्तींनी एक डोस घेतला अशा व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे प्रमाण ०.१९ टक्के इतके आहे, तर दोन डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना झाल्याचे प्रमाण ०.२५ टक्के इतके आहे. ससून रुग्णालयात दाखल असलेल्या एकुण रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण हे नगर जिल्ह्यातील आहेत. उर्वरीत ६० टक्के रुग्ण हे पुणे, पिंपरी चिंचवड, ग्रामीण भागातील आहेत.''

'सध्या सिरिंजचा तुटवडा जाणवत असल्याने पुण्यासाठी एक लाख सिरींज विकत घेतल्या आहेत. पिंपरी-चिंचवडसाठी सिरिंज विकत घेतल्या जाणार आहेत. कोरोना रुग्णाची संख्येत घट होत असली तरी सर्वांनी कोरोनाचे नियम पाळले पाहिजे. पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात सलग ७५ तास लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे,'' असे अजित पवार म्हणाले. जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांना गरज भासेल त्या वस्तू विकत घ्या, अशा सूचना पवारांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

येत्या ४ तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत, शाळेत कोविडच्या उपाययोजनांबाबत शिक्षणसंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. आठवडे बाजार टप्य्याटप्याने घेण्याबाबत विचार सुरु आहे, असे अजित पवार यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT