ajit pawar on atul benake and sharad pawar sarkarnama
पुणे

Video Ajit Pawar : पवारसाहेब अन् अतुल बेनकेंच्या भेटीवर अजितदादा थोडक्यातच बोलले; म्हणाले...

Atul Benake Meet Sharad Pawar : जुन्नरचे आमदार अतुल बेनके ( Atul Benake ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांची भेट घेतली. त्यामुळे अतुल बेनके राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगली आहे.

Akshay Sabale

महाविकास आघाडीला लोकसभेला यश मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय वारे उलट्या दिशेने वाहण्यास सुरूवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यातच अजितदादांचा आणखी एक आमदार पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे.

जुन्नरचे आमदार अतुल बेनके ( Atul Benake ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेबांची अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे अतुल बेनके राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगली आहे. या भेटीवर अजितदादांनी ( Ajit Pawar ) भाष्य केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

"अतुल बेनके यांनी शरद पवारसाहेबांची ( Sharad Pawar ) भेट घेतल्यानं काय झालं? अनेक आमदार माझी सुद्धा भेट घेतात. प्रसारमाध्यमांना बातम्या नसल्यानं ह्याची भेट घेतली, त्याची भेट घेतल्याचे वृत्त दाखविले जाते. त्यामुळे भेटीबद्दल आमदार बेनके यांना विचारा," असं अजितदादांनी म्हटलं आहे.

पवारसाहेबांच्या भेटीबद्दल अतुल बेनकेंची काय प्रतिक्रिया ?

बेनके म्हणाले, "विधानसभा निवडणुकीला अजून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यावर आता भाष्य करण्यात काही अर्थ आहे का? यदाकदाचित आम्ही महायुती म्हणून पुढे जात आहोत, पण जागा वाटपावरून काहीही होऊ शकतं. यदाकदाचित अजितदादा आणि साहेब (शरद पवार) एकत्र येऊ शकतात. मी एक छोटा घटक आहे. राज्यातील 288 आमदारांपैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे राजकारणात पुढे जात असताना पुढे काय घडेल, हे मी आता कसं सांगू शकतो."

"पवारसाहेब आणि आमच्यात पावसासंदर्भात चर्चा झाली. पाऊस अजूनही बऱ्याबैकी झालेला नाही. मध्यंतरी पाऊस झाल्यानं दुबार पेरणीचे संकट टळलं. धरणात अजूनही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. गुळुंचवाडीत झालेल्या अपघातप्रकरणी चर्चा झाली. त्यावर काय उपाय योजना करायच्या, त्यावर मी आणि खासदार अमोल कोल्हे यांनी चर्चा करून त्याबाबत पवारसाहेबांना माहिती दिली," असं बेनके यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT