Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar on Dhananjay Munde : 'पक्ष न बघता दोषींवर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं' ; अजित पवारांचं मोठं विधान!

Ajit Pawar on Sarpanch Santosh Deshmukh murder case : सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी धनंजय मुंडेंवरील आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया

Mayur Ratnaparkhe

Ajit Pawar reaction on allegations against Dhananjay Munde : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात महायुतीमधील प्रमुख पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे नावही वारंवार समोर येत आहे, विरोधकांनी तर मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे.

शिवाय, भाजप आमदार सुरेश धस(Suresh Dhas) आणि मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनीही धनंजय मुंडेंवर या प्रकरणावरून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जोरदार टीका सुरू केली आहे. दरम्यान, आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले, एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन चौकशी सुरू आहे. जो कोणी दोषी आहे, हे सिद्ध झाले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे. पक्ष न बघता जो कोणी दोषी असेल तर कोणाचीही गय करण्याची आवश्यकता नाही, हे मी मुख्यंत्र्यांना सांगितले आहे.'

तसेच, अशा घटना आम्ही खपवून घेणार नाही. सरकार गांभीर्याने लक्ष घातले आहे. काय बोलायाचे याचा प्रत्येकाला अधिकार. मात्र कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. जो दोषी असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.' असं अजित पवार म्हणाले.

याशिवाय, आरोप करण्यापेक्षा पुरावे द्यावे. पुराव्याशिवाय आरोप करणे कितीपत योग्य आहे. याबाबत माझी मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळेंशी(Chandrashekhar Bawankule) चर्चा झाली आहे. तीन एजन्सी चौकशी करत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, चौकशीत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. कोणालाही सोडणार नाही. दोषींना पाठीशी घालणार नाही. तुम्ही काळजी करु नका.' असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT