सरकारनामा ब्यूरो
पुणे : आयकर विभागाचे पाहुणे आलेत ते चौकशी करून गेल्यानंतर मला काय बोलायचे ते बोलेन मी पळून चाललेलो नाही. त्यांच्या चौकशीत अडथळा निर्माण होईल, असे मी काही करणार नाही. त्यामुळे घाई करू नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुण्यात कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘ की कधीही नियमबाह्य वागत नाही.प्रत्येकाने सरकारचे कर वेळेत भरावेत असा माझा नेहमी आग्रह असतो. माझ्याशी संबंधित सर्व सहकारी तसेच खासगी संस्थांना अर्थिक शिस्त लावण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे उपस्थित करण्यात येत असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे. जरंडेश्वरचा मालक कोण याचेही उत्तर मी देणार आहे.’’
पुण्यातील नाट्यगृहे पन्नास टक्के क्षमेतेने चालविण्यास २२ ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात येईल. येत्या सोमवारपासू पुण्यातील हॉटेल रात्री ११ पर्यंत सरू ठेवण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. शहर आणि जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येतील. मात्र, प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या दोन लशीमधले ८४ दिवसांचे अंतर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे सध्या लशीचा पुरवठा होत असून उपलब्ध लस देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. उर्वरित नागरीकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
Edited By : Umesh Ghongade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.