Ajit Pawar

 

Sarkarnama

पुणे

गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करणार : अजित पवारांचा इशारा

राज्यात 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त आमदारांना कोरोनाची लागण.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोरोना (Corona) रुग्णांची संख्या राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शुक्रवारी राज्यभरात 8 हजार कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांच्या संख्या वाढीचे प्रमाण पाहून नियम केले जाणार आहेत. गरज पजल्यास कठोर निर्बंध लागू कारवे लागतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला.

अजित पवार यांनी कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथील विजयस्तंभाला अभिवादन केले. कोरेगाव भीमाच्या लढाईतील शुरांना अभिवादन करतो, इथला इतिहास स्मरणात राहील. कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभ परिसराचा विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला, असे पवार म्हणाले.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता निर्बंध अधिक कठोर करण्यात येतील, असे पवार म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या वाढीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन नियम लागू करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे, असेही पवार म्हणाले.

मुंबई आणि पुणे शहरात कोरोनाचे आकडे वाढत आहेत. या शहरात आकडे वाढले की इतर ठिकाणी त्याचा प्रसार होतो. इथले आकडे पाहून कटू निर्णय घ्यावा लागू शकतो, असे संकेत पवार यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT