Ajit Pawar News : अजित पवार हे मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड, आयटी पार्क, चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अॅक्शन मोडवर आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आयटी पार्कमधील रस्त्यांची पाहणी करत सूचना केली होती. आज ते सकाळी त्यांनी चाकण चौकात पाहणी केली. अजित पवार हे पाहणी करत असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रस्त्यावरील वाहने रोखून धरली होती.
त्यामुळं अजित पवारांनी पोलिस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले. 'ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केलीये, सगळी वाहतूक सुरु करा.', असे अजित पवार म्हणाले.
चाकण एमआयडीसी परिसरात तीन ते साडेतीन लाख कर्मचारी काम करतात. येथे छोट्या कंपन्यांसह अनेक नामांकीत कंपन्या आहेत. चाकण चौकातून एमआयडीसीकडे दररोज लाखभर वाहने प्रवास करत असतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीने कंपनीतील कर्मचारी त्रस्त आहे तर या परिसरातील नागरिकांना देखील या कोंडीचा मोठा फटका बसतो. त्यामुळे अजित पवारांनी ही कोंडी सोडवण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
पिंपरी-चिंचवड परिसरातील तसेच माण-हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी पोलिसांसह अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या आहेत. वेळप्रसंगी रस्ता रुंदीकरणाला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. दरम्यान, चाकण आणि चाकण एमआयडीसी दरम्यान वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर अजित पवार आकुर्डीतील पीएमआरडीए कार्यालयात बैठक घेणार आहेत.
रस्त्याचे रुंदीकरण करून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवार आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या आहेत. मात्र, माण हिंजवडीतील ग्रामस्थांनी रस्त्याच्या रुंदीकरणास विरोध दर्शवला आहे. विकास आराखड्याप्रमाणे गावठाणातील रस्ते 24 मीटर असावेत अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यासाठी ग्रामसभेत ठराव देखील करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.