Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar In Baramati : बारामती लोकसभेतील दोन प्रकल्पांबाबत अजितदादांचे मोठे विधान; म्हणाले, "तिजोरी हातात..."

Baramati Ajit Pawar Sabha : राज्यातील दुष्काळी भागाला दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील

सरकारनामा ब्यूरो

Pune Political News : राज्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. बारामतीत येताना तालुक्यातील पिके जळालेली पाहिली. मयुरेश्वराला पाऊस चांगला पाडण्याचे साकडे घातले. तालुक्यातील जनाई-शिरसाई योजना आणि पुरंदर जलसिंचन योजनेसाठी मंजूरी मिळाली की निधी देण्याची सोय मी करतो. कारण तिजोरी आपल्या हातात आहे, असे सांगून अजित पवारांनी बारामतीकरांना धीर दिला. दरम्यान, या दोन्ही योजना बारामती लोकसभा मतदारसंघातील म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातली असल्याने दादांची या 'शब्दा'ची राजकीय वर्तुळात चर्चा नक्की होणार, हे निश्चित. . (Latest Political News)

उपमुख्यमंत्री पदावर पाचव्यांदा बसल्याने अजित पवार (Ajit Pawar) शनिवारी प्रथमच आपल्या मतदारसंघ बारामतीत आले. बारामतीकरांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर झालेल्या सभेत अजितदादांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाला दिलासा देणाऱ्या जनाई-शिरसाई आणि पुरंदर उपसा जलसिंचन योजनांची दुरुस्ती करणार असल्याचे सूतोवाच केले. यावेळी अजितदादांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करत राज्यातील जनतेलाही समजावून सांगणार असल्याचे सांगितले.

पवार म्हणाले, "सत्तेत सहभागी का झालो, याची माहिती तुम्हाला आहे. ती आता राज्यातील जनतेला समजावून सांगावी लागणार आहे. त्यासाठी राज्यभर सभा घ्यावा लागणार आहेत, असे सांगून पुढील त्यांच्या दौऱ्याची यादी सांगितली. मी शाहू-फुले-आंबेडकारांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे. हेच सर्वाना सांगावे लागणर आहे. राज्यातील सर्व घटकांना सरकार आपलेच आहे, याचा विश्वास देत आहे", असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

"मी सत्तेने हपापलेला कार्यकर्ता नाही. सत्ता येत असते जात असते. मात्र सत्तेमुळे मिळालेली संधी आपल्या लोकांची कामे, भागाचा विकास करण्यासाठी करवा लागतो. राज्यातील धरणे कमी प्रमाणत भरली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दुष्काळावार बैठक घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत. शिरसाई-जानाई आणि पुरंदर उपसा जलसिंचन योजनेतील पंप आणि जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ४०-५० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या कामाला परवानगी मिळताच निधी देण्याचे काम करू. कारण तिजोरी आपल्याच हातात आहे", असे अजितदादांनी सांगताच सभेत एकच हशा पिकला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT