Ajit Pawar Sarkarnama
पुणे

गृहमंत्रीपद म्हटलं की माझा बीपी वाढतो...गृहमंत्री नियुक्तीचा अजितदादांनी सांगितला किस्सा!

देव करो आणि तुमचा बीपी न वाढो आणि तुम्हाला कुठल्या आजाराचा सामना करायला लागू नये.

रोहिदास गाडगे

घोडेगाव (जि. पुणे) : गृहखातं देताना अनेकांना विचारलं. त्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना साद घातली. पण, गृहमंत्रीपद म्हटलं की माझा बीपी वाढतोय, असं म्हणत जयंत पाटलांनी जबाबदारी ढकलली. छगन भुजबळ यांनी तर न बोलताच नकार दिला. त्यानंतर ही जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांनी स्वीकारली. आपल्याला अशा व्याधी होऊ नये; म्हणजे बरं.., असं भाष्य करत अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्रीपद सोपविण्याबाबत पक्षात घडलेल्या घडामोडी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वळसे पाटलांसमोरच उलगडल्या. (Ajit Pawar tells the story of appointment of Home Minister!)

आंबेगाव पंचायत समितच्या कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आज दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आले. त्यावेळी बोलत होते. ते म्हणाले की, राज्यभरातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कारभाऱ्यांची मुदत येत्या डिसेंबर, जानेवारीत संपतेय. त्यातच आपल्या काळात झालेल्या विकासाचं श्रेय आपल्याच पदरी पडावं म्हणून का होईना आपल्या नेत्यांच्या कानी लागून उद्‌घाटनांचा घाट घातला जातोय, याचं प्रत्यय खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यात आला.

नव्याने उभारण्यात आलेल्या पंचायत समितीच्या इमारतीतील फर्निचरचे काम अपूर्ण असतानाही उद्‌घाटनाचा घात कसा घातला गेला, याचा किस्साच भरसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी सांगितला आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून फर्निचरसाठी 10 कोटीही पदरात पाडून घेतले.

व्यासपीठावरुन हा किस्सा सांगताना ते म्हणाले की, पुढील काही दिवसांत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कारभाऱ्यांची मुदत संपत आहे, त्यातच काही कारभारी गृहमंत्र्यांच्या कानी लागले आणि आमच्या काळात उभारलेल्या इमारतीच्या फलकावर आमचं नाव लागू द्या, असा आग्रह धरल्याने फर्निचर होण्याआधीच घाई करुन उद्‌घाटन करतोय, असं सांगताच सभेच हस्स्योकल्लोळ झाला. या विधानावर गप्प राहितील ते अजित पवार कसले...! ‘त्यांनी गृहमंत्र्यांचा धागा पकडत प्रत्येकजण स्वतची मुदत संपायच्या आत आपलं नाव लावायची वाटच पाहतोय...! ते लग्न असो वा राजकीय व्यासपीठ प्रत्येकालाच आपल्या डोळ्यासमोर आपलं नाव लागावं हीच अपेक्षा असते, असं म्हणत विद्यमान कारभाऱ्यांना टोमणा मारला.

दरम्यान राज्यातील गृहमंत्रालयाचा कारभार आणि कारभारी कायमच चर्चेत असतात त्यामुळे गृहखात्याचा कारभार हाती घेण्यासाठी कुन्हीही धजावत नसल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची नावे घेत भरसभेत जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी गृह खात्याचा कारभार संभाळायलाच नकार दिल्याचा किस्साच अजित पवार यांनी सांगितला. जयंत पाटलांचा बीपी वाढतोय, तर छगन भुजबळांनी न बोलताच नकारच दिला आणि हीच जबाबदारी वळसे पाटलांच्या खांद्यावर आली. पण, देव करो आणि तुमचा बीपी न वाढो आणि तुम्हाला कुठल्या आजाराचा सामना करायला लागू नये, असं म्हणत गृहमंत्री निवडताना झालेल्या गमतीजमती उलगडून दाखविल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT