Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Baramati : इकडं-तिकडं पदाधिकाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम; म्हणाले...

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामती तालुक्यातील लोकांमध्ये भावनेचे वातावरण आहे. ना अजित पवार ना शरद पवार कुणालाही दुखवायचे नाही, अशी काहीशी भूमिका बारामतीकरांमध्ये असल्याचे दिसून येत आहे. यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची समावेश आहे. ते दोन्हीही म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार Sharad Pawar गटाला साथ देताना दिसत आहेत. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला आहे. कुंकु लावायचेच असेल तर एकाचेच कुणाचे तरी लावा, अशा शब्दात अजितदादांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले आहे.

बारामतीच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांची Ajit Pawar तालुक्यातील शिर्सुफळ येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना आपल्या भाषेत खडसावले आहे. ते म्हणाले, मी आलो की माझ्या पुढे ते आले की त्यांच्या पुढे करणारे मला माहिती आहेत. एकच सांगतो, आता माझ्याबाबतीत काही चूक केली तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही, असे म्हणत अजितदादांनी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले.

काहीजण माझी सभा झाली की विरोधी पार्टीकडे जातात. त्यांना एकच सांगतो, तुम्हाला बिनविरोध निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले. त्यातून तुम्हाला विविध संस्थांवर मानाची पदे मिळालेली आहेत. आता प्रचार त्यांचा करत आहेत. कुंकू लावायचे असेल तर एकाचेच लावा. एक तर माझे नाही तर त्यांचे तरी लावा, असा दम भरल्यानंतर पवारांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काय झाले याकडेही लक्ष वेधले. तसेच नीट काम करण्याची तंबीही कार्यकर्त्यांना दिला. मतदारांना त्यांच्या अधिकार त्यांच्या पद्धतीने बाजावावा, असेही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पदाधिकाऱ्यांना दमबाजी केल्यानंतर अजित पवारांनी रोहित पवारांनाही Rohit Pawar टोला लगावला. ते म्हणाले, उद्या कदाचित ते बोलतील अजितदादा दम द्यायला लागले म्हणून. पण मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देतोय, असे म्हणत नाव न घेता रोहित पवारांवर टीका केली. आता मी चुकीचे काही बोलत नाही, असे म्हणत अजित पवारांनी धरणाबाबत केलेल्या वक्त्यव्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, त्या चुकीनंतर मी सतत मेंदुला सांगतो असतो की आपल्याला शब्द जपून वापरायचे आहेत. चुकीचे बोलायचे नाही. मीही चुकत चुकतच मोठा झालो. त्यामुळे सुनेला संधी द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT