ajit pawar. 
पुणे

माळेगावच्या प्रमुखांनी सभासदांशी जर चावटपणा केला तर मी तो खपवून घेणार नाही - अजित पवार 

तर पळता भुई थोडी करेन ......सभासदांचा उस गाळप करेपर्यंत जर माळेगावने गेटकेनचा उस आणला तर मग बोट वाकड केल्यावर लोणी कस काढता येत ते मला चांगलच माहितीय. मी जर वेगळ्या पध्दतीने हे केल तर मग पळता भुई थोडी करुन टाकीन.असा इशाराअजित पवार यांनी माळेगावच्या संचालक मंडळाला आज दिला.

मिलिंद संगई : सरकारनामा

बारामती   : " माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडून सभासदांचा आडसाली उस गाळल्याशिवाय गेटकेनचा उस गाळपाला आणला तर मी शेजारच्या कारखान्याला सांगून माळेगावचा उस न्यायला लावीन .

 माळेगाव इतकाच भाव त्यांना द्यायला सांगेन.  माळेगावच्या प्रमुखांनी सभासदांशी जर चावटपणा केला तर मी तो खपवून घेणार नाही ",असा सणसणीत इशारा आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

बारामतीत राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात आज आपल्या खास शैलीत त्यांनी माळेगावच्या कारभा-यांचा खरपूस समाचार घेत माझ्या नादाला लागू नका, असा इशाराच दिला.

" माळेगाव कारखान्याचा गेटकेनचा उस आणण्यात वेगळा इंटरेस्ट आहे, तेथील काही जणांच्या ट्रक ट्रॅक्टर असल्याने वाहतूकीचे पैसे मिळत असल्याने त्यांना गेटकेनमध्ये अधिक रस आहे . ज्या उसात जास्त रिकव्हरी आहे तो अगोदर आणा पण तो सभासदांचाच हवा." असे  पवार म्हणाले . 

" आडसालीची जेवढी लागण झालेली आहे तिचे गाळप होईपर्यंत राष्ट्रवादीचे सभासद कार्यकर्ते गेटकेनचा उस गाळप करु देणार नाहीत. दुस-याची धन करण्यासाठी शेंबेकरांनी हा कारखाना उभा केलेला नाही .  हा कारखाना सभासदांचा आहे," असे पवार यांनी ठणकावले.  

 भाजप -सेनेच्या सरकारने कोणीही कुठलाही उस घेऊन जायला परवानगी दिलेली असल्याने या कार्यक्षेत्रातील उस दुसरा कारखाना गाळपासाठी नेऊ शकतो ,असा इशारा अजित पवारांनी दिला.

" एकीकडे सोमेश्वर कारखाना आम्ही कर्जमुक्त केला आणि दुसरीकडे विस्तारीकरणाने माळेगाव कारखाना कर्जबाजारी झाला आहे, केवळ एका माणसाच्या हट्टापायी हे सगळे होत आहे . संस्था चालविताना तुम्ही मालक नाहीत, विश्वस्त आहात याचा विसर पडू देऊ नका ," अशी   टीका अजित पवार यांनी या वेळी चंद्रराव तावरे यांचे नाव न घेता केली.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT