Jay Pawar-Ajit Pawar-Sunil Tatkare Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : अजितदादा बारामती विधानसभेच्या रिंगणात असतील का?; सुनील तटकरेंनी सगळंच सांगून टाकले...

Sunil Tatkare's Reaction to Ajit Pawar's statement : बारामतीमधून जय पवार हे विधानसभा निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय हा पार्लमेंटरी बोर्ड आणि बारामतीचे कार्यकर्ते घेतील. मी बारामतीतून सात ते आठ वेळा निवडून आलो आहे, त्यामुळे मलाही फारसा इंटरेस्ट नाही, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Vijaykumar Dudhale

Pune, 15 August : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाइच्या जनसन्मान यात्रेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हेच दाखवतंय की अजित पवार हे विधीमंडळात असावेतच. पार्लमेंट्री बोर्ड आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगतो की, अजितदादा हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

बारामतीमधून जय पवार (Jay Pawar) हे विधानसभा निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय हा पार्लमेंटरी बोर्ड आणि बारामतीचे (Baramai) कार्यकर्ते घेतील. मी बारामतीतून सात ते आठ वेळा निवडून आलो आहे, त्यामुळे मलाही फारसा इंटरेस्ट नाही, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमाशी बोलताना केले आहे.

पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात जनसन्मान यात्रा आज पोहोचत आहे, त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमापूर्वी माध्यमाशी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विधानसभेची निवडणूक अजित पवार यांनी लढवलीच पाहिजे, अशी भूमिका मांडली.

तटकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून लढणार आहे. एखाद्या नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाते, त्या वेळी त्या नेतृत्वाने निवडणूक लढवावी, असे अपेक्षित असतं. ते कोणत्या अनुषंगाने बोलले आहेत, हे मला माहिती नाही.

पार्लमेंट्री बोर्ड आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून अजितदादा हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील, असं माझं मत आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, अशी माझीच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राची ती इच्छा आहे. हे करत असताना निवडणूक लढणं हा एक भाग आलाच, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आठ तारखेपासून जनसन्मान सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात निघालेल्या यात्रेला उत्तर महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या यात्रेची सुरुवात आज पुण्यातून होत आहे.

महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद या यात्रेला मिळत असून त्या मोठ्या संख्येने अजित पवार यांच्या स्वागतासाठी येत आहेत. महिला भगिनींचे आशीर्वाद अजित पवार यांच्या पाठीशी ‘दादा’ म्हणून मिळत आहेत, ही आमची ताकद आणि शक्ती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा झोत निश्चितपणाने बदलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT