Ajit pawar
Ajit pawar Sarkarnama
पुणे

मिटकरींच्या 'त्या' वक्तव्यावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : ब्राम्हण समाजाबाबत राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari) यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात वाद पेटला आहे. मिटकरी यांचे मंत्रोच्चारण आता वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्या विरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वच पक्षांच्या राजकीय व्यक्तींनी बोलत असतांना तारमत्य ठेवूनच वक्तव्यं केले पाहीजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.

पवार म्हणाले, 'माझं नेहमी स्पष्ट मत असतं हे तुम्हा सर्व मीडियाला माहिती आहे. तुम्ही नेहमी मला असले प्रश्न विचारत असता की, याने असं वक्तव्य केलं त्याबद्दल तुमचं मत काय आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाचा किंवा घटकाचा अवमान होणार नाही तसेच नाराजी वाढेल, असे वक्तव्य करू नये. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या व्यक्तींनी व कार्यकर्त्यांनी तारतम्य ठेवूनच वक्तव्यं करायला पाहिजेत, असे स्पष्ट मत पवार यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेला इस्लामपूरमध्ये सुरुवात झाली. त्यावेळी झालेल्या सभेत अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाबद्दल विधान केले होते. भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी राज्यभर मिटकरींच्या विधानाचा निषेध केला जात आहे. मिटकरींच्या मंत्रोच्चारणाचा निषेध करत ब्राम्हण महासंघाने काल (ता. 22 एप्रिल) पुण्यात राष्ट्रवादीच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी या आंदोलकांचा मिटकरी यांच्याविरोधात कमालीचा रोष दिसून आला होता. लग्नाचा विधी, कन्यादान याविषयी अमोल मिटकरींनी केलेल्या विधानांमुळे ब्राह्मण, हिंदू समाजाची बदनामी झाल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आला होता.

दरम्यान, मी कोणत्याही पक्षाबद्दल आणि जातीबद्दल बोललो नाही. ज्यांना वाटत असेल की, मी माफी मागावी त्यांनी अगोदर जिजाऊंची माफी मागावी मी माफी मागायला तयार आहे, असे म्हणत मिटकरींनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता. मिटकरीच्या या विधानावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. महाजन म्हणाले, आमदार अमोल मिटकरी सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला असे त्यांनी करू नये. मिटकरी हे जिभेला हाड नसलेला आमदार आहेत. त्यांनी बोलताना जातीय विष पेरले जाणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. तर मनसेचे आमदार राजू पाटीलांनी मेंटल मिटकरींबाबत काय बोलणार? अशा शब्दात मिटकरींची खिल्ली उडवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT