Government Employees  Strike News :
Government Employees Strike News : Sarkarnama
पुणे

Pune : सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर ; येत्या १४ मार्चपासून काम बंद

सरकारनामा ब्युरो

Government Employees Strike News : विविध मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी हे १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष मारुती शिंदे यांनी शुक्रवारी (ता.२४) याबाबतची घोषणा केली.याबाबत पुणे जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी आरोग्य विभागातील नंदकुमार गुडमेट्टी, संजय कडाळे, जिल्हाध्यक्ष मारुती शिंदे, ससून रुग्णालयातील दिनेश कुचेकर, पाटबंधारे विभागातील कृष्णा साळवी, सहकार विभागातील संध्या काजळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील विनायक राऊत, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महेश घुले, आशा बांदल, निर्मला चौधरी आदी विविध विभागातील कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या संपामध्ये सर्व सरकारी कार्यालये, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षक,शिक्षकेत्तर, निमसरकारी आणि कंत्राटी आदी सर्व संवर्गातील कर्मचारी सहभागी होणार आहेत.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व विविध शासकीय कर्मचारी संघटना समन्वय समिती यांच्यावतीने हा संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT