Allocation funds DPC Protest Against Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Supriya Sule: तीन आमदारांना घेऊन सुप्रियाताईंचे अजितदादांच्या विरोधात आंदोलन; नेमकं काय झालं

Allocation funds DPC Protest Against Ajit Pawar: ज्या लोकांनी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यांचा या निधीवर हक्क आणि अधिकार आहे. हा कोणाच्या खिशातला पैसा नसून हा लोकांनी कर स्वरूपात भरलेला पैसा निधी स्वरूपात आम्ही लोकांच्या विकासासाठी मागत आहोत.

Sudesh Mitkar

Pune News: पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधी वाटपावरून सध्या जिल्ह्यातील राजकारण चांगला तापलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडून निधी वाटपामध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांना निधी दिला जात नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

या निधी वाटपामध्ये होत असलेल्या तुज्याभावाच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार अशोक पवार, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि संजय जगताप उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "डीपीडीसीच्या माध्यमातून जो निधी आम्ही मागितला त्याच्यावर काट मारली गेली आहे. आम्ही स्वतःसाठी निधी मागत नसून ज्या जनतेने आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्या जनतेची विकास काम करण्यासाठी निधी मागत आहोत. याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही आंदोलन केले. निधी वाटपामध्ये दुजाभाव संविधानाच्या विरोधात असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार जेव्हा राज्यात होतं. त्यावेळी सर्वांना निधी दिला जात होता यासाठी नेत्यांचं मन मोठं असणं आवश्यक आहे. विरोधक असले तरी निवडणुकांमध्ये एकमेकांसोबत लढू मात्र निवडून आल्यानंतर सर्व समसमान याच धोरणावर आतापर्यंत आम्ही काम केले आहे. ज्या लोकांनी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यांचा या निधीवर हक्क आणि अधिकार आहे. हा कोणाच्या खिशातला पैसा नसून हा लोकांनी कर स्वरूपात भरलेला पैसा निधी स्वरूपात आम्ही लोकांच्या विकासासाठी मागत आहोत. ती कोणाची वैयक्तिक मालमत्ता नसल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

चंद्रकांतदादांच्या काळात झालं नव्हतं ते अजितदादांच्या काळात झाले...

आमदार संग्राम थोपटे म्हणाले, याप्रकारे निधी वाटपामध्ये डावलण्याचा प्रकार यापूर्वी कधीच जिल्ह्यामध्ये झाला नाही. यापूर्वी जेव्हा भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री होते त्यावेळी देखील आम्ही निधीची मागणी केली होती आणि त्यांनी निःपक्षपाती आम्हाला निधी दिला होता. मात्र आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आम्हाला हा निधी डावलला जात आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती आणि शिरूर मतदारसंघात त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही म्हणून हा निधी डावलला जात असल्याची आम्हाला शंका आहे. त्यांचा पराभव झाला असला तरी सरकार म्हणून त्यांनी सर्व ठिकाणी समान न्याय देणे आवश्यक आहे. त्यामुळे निधी वाटपामध्ये दुजाभाव नको अशी आमची मागणी असल्याचं थोपटे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT