Amit Shah on Babasaheb Purandare Shivasrishti Pune : पुण्यातील शिवसृष्टीच्या प्रथम टप्य्याचा लोकापर्ण सोहळा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. अमित शाह यांनी यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचे कौतुक केले.
"स्वधर्म, स्वराज्य, स्वभाषा हा शिवाजी महाराजांचा विचार नव्या पिढी पर्यंत पोचविण्याचे काम या शिवसृष्टीद्वारे होईल. शिवसृष्टी हे आशियातील सर्वात मोठा 'थीम पार्क'ठरणार आहे. शिवसृष्टीचं काम ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल. शिवाजी महाराजांचे जीवन हे एका राजाचे जीवन नव्हे तर तो एक विचार आहे," असे अमित शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले, "बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराज यांचा विचार देशभर पोहोचवला. "जाणता राजा" या महानाट्याच्या माध्यमातून त्यांनी मोठ कार्य केलं. शिवाजी महाराज यांच्या विचारासाठी पुरंदरे यांनी जगभरातून संदर्भ जमा केले. शिवरायांसाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. शिवरायांच्या विचार त्यांना सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवला. पुरंदरे यांनी हे काम केले नसते, तर शिवाजी महाराज यांची ओळख मोठ्या प्रमाणात देशभर पोहचली नसती, पुरंदरेंचं स्वप्न आज सत्यात उतरत आहे,"
"शिवसृष्टींच्या निर्मितीत आधुनिकरण, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिवसृष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. बाबासाहेब पुरंदरेंचे देशावर हे उपकार आहेत. शिवचारित्र्यासाठी ते देशभर फिरले. त्यांनी जगभरातून शिवाजी महाराज यांच्यासंबधीचे अनेक दस्ताऐवज, वस्तू गोळा केले. त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोचविण्याचे काम केले, "असे शाह म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. शिवसृष्टीसाठी 50 कोटीचा निधी सरकारने दिला आहे. यापुढे ही सरकारकडून शिवसृष्टी साठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल,"
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "बाबासाहेब पुरंदरे यांनी 50 वर्ष शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे आणण्याचे काम केले.त्यांचे शिवसृष्टीचे स्वप्न आपण पूर्ण करू. शिवसृष्टी या प्रकल्पातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचे काम होणार आहे.आपला स्वाभिमान तेवत ठेवण्याचे काम याद्वारे होईल. आज आपण कोणामुळे आहोत, हे शिवसृष्टी नव्या पिढीला सांगेल," महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानाचे वतीने या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.