Amit Shah Sarkarnama
पुणे

BJP State Conclave in Pune: भाजप निष्क्रीय आमदारांना दाखवणार घरचा रस्ता; शहांच्या हाती 'प्रगती पुस्तक'

BJP Cut Ticket Assembly Election 2024 MLA Performance: शाह यांनी प्रदेश सरचिटणीसांशी चर्चा करून राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. राज्यातील वातावरण भाजपसाठी फारसे पोषक नाही, कार्यकर्ते, पदाधिकारी संभ्रमात आहेत, अशी माहिती यावेळी शाह यांना देण्यात आली.

सरकारनामा ब्यूरो

Pune News: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपला फटका बसला आहे. त्यांचे चिंतन पु्ण्यात झालेल्या अधिवशनात (BJP Adhiveshan) करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणताही धोका स्वीकारण्यास भाजप तयार नसल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे.

अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आमदारांचे 'प्रगती पुस्तक' तपासले. त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. काही आमदारांची कामगिरी असमाधानकारक असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी शहांना दिली. निष्क्रीय आमदारांना भाजप घरचा रस्ता दाखवणार असल्याची माहिती आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा झाली अधिवेशनात झाल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीत केवळ नऊ जागांवरच समाधान मानावे लागले. भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. लोकसभेतील पक्षाची सुमार कामगिरी पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती असली तरी जास्त जागा लढविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

राज्यात कार्यकर्त्यांमधील नैराश्‍य दूर होऊन उत्साह निर्माण होण्यासाठी हे अधिवेशन घेण्यात आले होते. अमित शाह यांनी आपल्या पुणे मुक्कामात राज्यातील प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांकडून विद्यमान आमदारांच्या कामकाजाची झाडाझडती घेतली.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही उमेदवार बदलले असते तर आणखी काही जागा जिंकता आल्या असत्या. त्यामुळे ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील सुमार कामगिरी असणाऱ्या, जनसंपर्क न ठेवणाऱ्या आमदारांना उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे.

शनिवारी रात्री पुण्यात अमित शाह मुक्कामी होते. अधिवेशनाच्या ठिकाणी येण्यापूर्वीही त्यांनी प्रदेश सरचिटणीसांशी चर्चा करून राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रदेश कोअर कमिटीची बैठकही घेण्यात आली.

राज्यातील वातावरण भाजपसाठी फारसे पोषक नाही, कार्यकर्ते, पदाधिकारी संभ्रमात आहेत, अशी माहिती यावेळी शाह यांना देण्यात आली. त्याचा उल्लेख शाहा यांनी आपल्य भाषणात केला.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काही मतदारसंघातील उमेदवार बदलले जावेत, अशी मागणी स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. पण पक्ष नेतृत्वाने या खासदारांवर विश्‍वास कायम ठेवत त्यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. त्याची नाराजी भाजपला भोवली असे मत काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत (2019) ज्या ठिकाणी चांगले मताधिक्य मिळाले होते, तेथील मताधिक्य कशामुळे घटले? संघटना, आमदार, माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्यांची ताकद असूनही पिछाडी का राहिली, यावर बैठकीत चर्चा झाली.

ज्या आमदारांचा नागरिकांशी जास्त संपर्क नाही, सोशल मिडियावरही पक्षाची भूमिका मांडण्यात निष्‍क्रीय आहेत, अशांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांचा विधानसभेसाठी विचार केला जावा, अशी मागणी शाह यांच्याकडे करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT