Amit Shah & Mahesh Landge

 

Sarkarnama

पुणे

अमित शहा पिंपरीत पुन्हा येणार..

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अस्मितेचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यती (Bullock Cart Race) पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भोसरीचे बैलगाडाप्रेमी पैलवान आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी यशस्वी पाठपुरावा केला. राज्यातील फडणवीस सरकारच्या काळात कायदा केला. तसेच, त्यावेळी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमुळे सर्वोच्च नयायालयात (Supreme Court) शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु झाल्याचे श्रेय आपला पक्ष व नेत्यांना दिले. अखिल भारतीय बैलगाडा संघटना व बैलगाडा शर्यतप्रेमींचेही त्यांनी कौतूक केले आहे.

शहा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल शिर्डी, नगर येथून ते पुण्यात मुक्कामास आले. सकाळी दगडूशेठ गणपती दर्शनाने त्यांचा आजचा (ता.19 डिसेंबर) दौरा सुरु झाला. तळेगाव (ता.मावळ) येथील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे उदघाटन केल्यानंतर पिंपरी-चिंचवड भाजपच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर हिरानानी घुले, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदींनी त्यांची भेट घेतली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या शिष्टमंडळाची तथा शहरातील भाजप नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची ओळख शहांना करून दिली. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहितीही त्यांनी शहांना दिली. यावेळी शहरात भोसरी विधानसभा मतदारसंघात मोशी येथे पालिकेकडून उभारल्या जात असलेल्या शंभूसृष्टीचे अनावरण करण्यासाठी लांडगेंनी त्यांना निमंत्रण दिले. त्यांनी ते स्विकारले. त्यामुळे पुढील वर्षी डिसेंबरमध्ये उद्घाटन होणार आहे. 110 कोटींचा हा प्रकल्प साडेपाच एकर जागेवर उभारला जात आहे. त्यात छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा अर्थात 'स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण' असणार आहे.

जगप्रसिद्ध शिल्पकार आणि अहमदाबाद येथील 'स्टॅचू ऑफ युनिटी'चे शिल्पकार राम सुतार हे तयार करीत आहेत. त्याचे 53 टक्के काम पूर्ण झाले आहे. नुकतीच बैलगाडा शर्यतीच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला गेलेले लांडगे यांनी या पुतळा निर्मितीची पाहणी केली. या पुतळ्याची प्रतिकृतीही यावेळी त्यांनी शहांना भेट दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT