Amol Kolhe
Amol Kolhe  Sarkarnama
पुणे

भुर्रर्रर्र...! निमगावच्या घाटात धुरळा उडणार, अमोल कोल्हे घोडी धरणार

सरकारनामा ब्युरो

पुणे : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी लोकसभा निवजणूकीच्या प्रचारात बैलगाडा शर्यतीत घोडीवर बसणार असल्याचा शब्द दिला होता. हा शब्द आज अमोल कोल्हे सत्यात उतरवणार आहेत. खंडोबाचा मानाचा हा घाट असलेल्या पुण्यातील निमगाव दावडी येथील घाटातील बारीत खासदार कोल्हे घोडीवर बसणार आहेत. निमगाव दावडीचे बैलगाडा मालक आजच्या दिवशी या मानाच्या घाटात स्वखुशीने आपापल्या सर्जा-राजाची जोडी उतरवत असतात. तिथेच आज खासदार अमोल कोल्हे घोडीवर बसून, बैलजोडी समोर बारी मारणार आहेत. (Bullock cart race latest news update)

बैलगाडा शर्यतीवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे खुले आव्हान दिले होते. शर्यतींमध्ये घाटात गाड्यासमोर घोडीवर बसायचे असेल तर लांडेवाडीला या, असे आवतन आढळराव पाटील यांनी कोल्हे यांना दिले होतं. जुन्नर (Junnar) तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना आढळराव यांनी हे वक्तव्य कोल्हेंना खुले आव्हान दिले होते. डिसेंबर २०२१च्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विविध अटी व शर्ती घालत बैलगाडा शर्यतींना (Bullock Cart Race) परवानगी दिली आहे. बैलगाडा शर्यत सुरु करण्याबाबत आढळराव आणि कोल्हे यांच्यात द्वंद्व सुरु असते. यापार्श्‍वभुमीवर आढळराव यांनी कोल्हे यांना उपरोधिक आवतन दिले होते.

लोकसभेच्या निवडणुक प्रचारादरम्यान, बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन कोल्हे यांनी दिले होते. कोल्हेंच्या या आश्वासनाची आठवण करुन देत आढाळरावांनी त्यांना निमगावच्या घाटात येण्याचे खुले आव्हान दिले. 'खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्या गावातील घाटात बैलगाडा शर्यतीत भाग घेऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द सत्यात उतरवावा, असे त्यांनी म्हटलं. दरम्यान आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी या त्यांच्या गावातील घाटातून आढळरावांनी कोल्हेंना निमंत्रण धाडलं अखेर आढळराव पाटलांचे आव्हान कोल्हेंनी स्वीकारले आहे.

अमोल कोल्हे काय म्हणाले होते

“हा अमोल कोल्हे मालिका विश्वातून निवृत्ती घेणार आणि तुमच्या सेवेसाठी उपस्थित असणार. तसा दुसरा शब्द बैलगाडा मालकांना देतो. ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल. त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो,” असे अमोल कोल्हे यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT