Amol Kolhe
Amol Kolhe sarkarnama
पुणे

'पवार साहेबांचा अर्धवट व्हिडीओ व्हायरल करुन फॉल्स नॅरेंटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न!'

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडीओवरुन खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी जोरदार टीका केली. पवार साहेबांनी दाखला दिलेल्या अर्धवट कविता सांगून फॉल्स नॅरेटिव्ह तयार केले जात, असल्याचा आरोप त्यांनी केला. हा प्रचार आपण हाणून पाडला पाहिजे आणि शाश्वत विकासाची वाट धरली पाहिजे, असेही कोल्हे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात कोंढवा येथे आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी कोल्हे म्हणाले, येत असताना भोंग्याचे दुकान लागले होते. त्यात एक भगवा आणि एक हिरवा भोंगा बघितला. त्यात एक रंग नसलेला भोंगा अडगाळीत पडला होता. मात्र, कोविड काळात रंग नसलेला भोंगा काम करत होता. रंग नसलेल्या भोंग्यातून 'जन गण मण' वाजत होत. सध्या त्याच भोंग्याची गरज असल्याचे, सांगत अमोल कोल्हे यांनी भोंग्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावर निशाणा साधला.

गादीसाठी ज्याने स्वतःच्या बापाला तुरुंगात डांबून ठेवले. ज्याने स्वत:च्या भावांच्या कत्तली केल्या, त्यापुढे नतमस्तक होऊन काय आदर्श आपण समोर ठेवतोय. औरंगजेबाचे उदात्तीकरण करुन तुम्ही कोणता आदर्श उभा करु पाहत आहात, असा सवाल करत कोल्हे यांनी एमआयएमचे नेते आमदार अकबुरुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका केली. कोल्हे म्हणाले, छत्रपतींच्या महाराष्ट्रात आठरा पगड जातींचे आणि सगळ्या धर्माचे लोक जेव्हा एकत्र लढत होते, तेव्हा महाराष्ट्रावर अफजल खानाचे संकट आले. तेव्हा, महाराजांचे अंगरक्षक हे सिद्धी इब्राहीम होते, असेही त्यांनी सांगितले.

माता भगिनींना जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काम करण्याची संधी मिळते तेव्हा त्यांची जात धर्म बघितला जात नाही. जेव्हा एमआयडीसीच्या माध्यमातून घरामध्ये विकासाची गंगा येते तेव्हा त्यांची जात पाहिली जात नाही. जेव्हा ७० हजार कोटींचे कर्ज माफ होते, तेव्हा शेतकऱ्यांचा धर्म पाहिला जात नाही. तरुण पिढीला हे सांगण्याची गरज आहे की आजकाल हातात दगड दिले जात आहेत. तो दगड भिरकवण्यासाठी आहे का रचण्यासाठी हे ठरवता आले पाहिजे.

कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात जन्माला आलो. कोणत्या पंथात, कोणत्या प्रातांत जन्माला आलो हे माझ्या हाहात कधीच नव्हते. मात्र, दोन पर्याय उरतात, याचा न्यूनगंड किंवा अहंकार न बाळगता काम केले पाहिजे. माझ्या कतृत्वाने माझ व्यक्तीमहत्त्व अशा उंचीवर नेऊन ठेवीन की माझा माझ्या जातीला, माझ्या प्रांताला माझ्या पंथाला, धर्माला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या राष्ट्राला अभिनान वाटला पाहिजे, असेही कोल्हे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT