Amol Kolhe  Sarkarnama
पुणे

Amol Kolhe : 'शेतकऱ्याच्या पोराचं मोदी कौतुक करतात म्हणून बेनकेंना पश्चाताप'; कोल्हेंचा पलटवार

Amol kolhe : अतुल बेनकेंच्या टिकेला खासदार अमोल कोल्हे यांनी उत्तर दिले असून शेतकऱ्याचा पोरगा खासदार झाला आणि त्याचं पंतप्रधान कौतुक करतात याचा पश्चाताप झाला का? असा सवाल त्यांनी बेनके यांना केला आहे

Sudesh Mitkar

Shirur Lok Sabha Election : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके Atul Benke यांनी अमोल कोल्हे Amol Kolhe हे खासदार झाल्याने आपल्याला पश्चाताप झाल्या असल्याची टीका केली होती. या टिकेला आता खासदार अमोल कोल्हे यांनी उत्तर दिले असून शेतकऱ्याचा पोरगा खासदार झाला आणि त्याचं पंतप्रधान कौतुक करतात याचा पश्चाताप झाला का? असा सवाल त्यांनी बेनके यांना केला आहे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे Amol Kolhe आज जुन्नर तालुक्याच्या junnar Taluka दौऱ्यावर आहेत. यावेळी निमगाव येथे कोल्हे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना कोल्हे म्हणाले की, घरात चार टर्म आमदारकी नव्हती, तरी शेतकऱ्यांचं पोरगं खासदार झालं, या खासदार शेतकऱ्याच्या पोराचं पंतप्रधान कौतुक करतात म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला का? असा सवालही त्यांनी केला.

सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कांद्याची माती झाली आणि त्यासाठी संसदेत मी आवाज उठवतो, शेतकऱ्यांनाचे प्रश्न मांडतो म्हणून पश्चाताप झाला?, शेतकऱ्याच्या पोराला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळतो म्हणून पश्चाताप झाला ? तुमच्या खासदाराचा देशात तिसरा नंबर लागला म्हणून तुम्हाला पश्चताप झाला? ज्यांच्यामुळे तुमची लॉटरी लागली त्यांचा तुम्हाला पश्चताप झाला ? असे सवाल उपस्थित करत कोल्हे यांनी नाव न घेता अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके Atul Benke यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

कोल्हे पुढे म्हणाले, कोण दबाव टाकत असेल तर मी ठामपणे उभा आहे हे लक्षात ठेवा, दबाव टाकणाऱ्यांना सांगा केंद्रातील मोदी सरकार जाणार आहेच, जुन्नर तालुक्याचा आमदार महाविकास आघाडीचाच होणार आहे, तुम्हाला पश्चात्ताप झाला असे सांगत असला तरी, उलट जुन्नर तालुक्याला पश्चताप झालाय, शिवाजी महाराजांनी कोणाला दगा फटका दिला नव्हता. तुम्ही शरद पवारांना Sharad Pawar दगा फटका दिला, म्हणून जुन्नरच्या जनतेला पश्चताप झालाय, अजून विधानसभेची निवडणूक आहे मी या निवडणुकीतून मोकळा झालो की करारा जवाब मिलेगा, सत्तेतील लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला निधी मिळाला, आता तुम्ही कोणाची पालखी वाहता हे लोकांना कळतंय अशी टीका कोल्हे यांनी यावेळी केली.

Edited By : Rashmi Mane

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT