Pune News : भीमाशंकर कारखान्याच्या सभेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात विधानसभा लढण्यास इच्छुक असणारे शरद पवार गटाचे देवदत्त निकम या दोघांच्या समर्थकांमध्ये जुंपली. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे Amol Kolhe यांनी दिलीप वळसे पाटील यांना इशारा दिला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेली भीमाशंकर कारखान्याची बैठक वादळ ठरली. सभेत तब्बल दोन तास गदारोळ सुरू होता. दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहिला मिळाले. पोलिसांनी तणाव वाढू न देता हस्तक्षेप केला. त्यानंतर कारखान्याची सभा सुरु झाली. या घटनेनंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त करत थेट दिलीप वळसे (Dilip Valse Patil) पाटलांना इशारा दिला आहे.
अमोल कोल्हे Amol Kolhe म्हणाले, कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये जी दुर्दैवी घटना घडली ती अत्यंत निषेधार्य आहे. या सर्वसाधारण सभेत सभासद असणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणं देखील ऐकून घेण्यात आलं नाही तसंच विद्यमान संचालक देवदत्त निकम यांना देखील शेतकऱ्यांची बाजू मांडून दिली नाही.
देवदत्त निकम यांचं या कारखान्या संदर्भात मोठं कार्य आहे. साखर कारखान्याच्या निर्मितीपासून ते चेअरमन होण्यापर्यंत देवदत्त निकम यांनी मोलाची कामगिरी कारखान्याबाबत केली आहे. असे असताना देखील त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेण्यात आलं नाही. आणि हे केवळ फक्त राजकारणापोटी करण्यात आलं असल्याचे टीका अमोल कोल्हे यांनी केली.
सहकारातल्या तत्वांची पायमल्ली ही सहकार मंत्र्यांच्या समोर होत असताना सहकार मंत्र्यांनी यावर चुप्पी साधली होती. त्यामुळे या सर्व प्रकाराला सहकार मंत्र्यांची मुखसंमती होती का? असा प्रश्न निर्माण होतो. कारखान्याची कोणत्याही संबंध नसलेल्या लोकांनी सभासद असलेल्या शेतकऱ्यांना मारहाण केली. तसंच जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आणि गृहमंत्र्यांनी या संदर्भातील चौकशी तातडीने करावी अशी आमची मागणी असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांना झालेल्या मारहाणीची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. जनता हे सगळं पहात असून जर आमचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही असा उन्माद सत्ताधारी अथवा कार्यकर्त्यांकडून दाखवण्यात येत असेल तर घोडे मैदान जवळच आहे. जनता आशा उन्मादाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा अमोल कोल्हे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.