Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil Sarkarnama
पुणे

Amol Kolhe Vs Adhalrao Patil : आढळरावांना साथ देणारे कधीही आमदार झाले नाहीत; अमोल कोल्हेंचा घणाघात

Shirur Loksabha Constituency : "आढळरावांच्या उमेदवारीबाबत दिल्लीपर्यंत चर्चा"

सरकारनामा ब्यूरो

Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil : लोकसभा 2024 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकारणात दररोजच नवनवीन ट्विस्ट समोर येत आहे. त्यामुळे शिरूरमधील राजकारण चांगलेच तापले आहे. हा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे आहे. मात्र त्यावर भाजपकडूनही वारंवार दावा सांगितला जात आहे. अशातच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर सतत टीकेची झोड उठवली आहे. या टीकेचा खासदार कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेतला. (Latest Political News)

आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर शिरुरमध्ये एकही सांगण्यासारखे काम न केल्याचा आरोप केला. यावर कोल्हे म्हणाले, शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या चार वर्षात होणाऱ्या सर्व विकासकामांचे श्रेय आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहात. मग ही कामे पंधरा वर्षांच्या काळात घडायला हवी होती. मात्र यावर सविस्तर तारीख, वार, पुरावे या सगळ्यानुसार बोलू. त्याआधी लोकसभेची उमेदवारी तरी जहीर होऊ द्या."

कोल्हे यांनी आढळरावांना साथ देणारे कधीही आमदार म्हणून निवडून आले नसल्याचा आरोपही यावेळी केला. कोल्हे म्हणाले, "आता तुमचे मित्र पक्ष असलेल्या भाजपने शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. शिरूरमधील जनतेसह भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ लोकांनाही माहिती आहे की आपल्याला उमेदवारी दिली तर काय होते. आपल्याला साथ देणारे आमदार निवडून येत नाहीत. हा गेल्या १५ वर्षांचा इतिहास आहे. याला फक्त दोन अपवाद आहेत, ते म्हणजे महादेव बाबर आणि स्व. सुरेश गोरे. तेही त्यांच्या स्वकर्तृत्वावर निवडून आले. अन्यथा १५ वर्षांत तुमची खालची पाटी कोरी आहे, याची सर्वांनाच जाणीव आहे."

काय म्हणाल होते आढळराव पाटील ?

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली होती. आढळराव म्हणाले होते, "डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेची सरळसरळ फसवणूक केली. शिरूरमधील जनतेशी त्यांनी प्रतारणा केलेली आहे. एका गावात मी काम केले असे त्यांनी ठामपणे सांगावे. बोलताना ते अभिनयाच्या जोरावर नाटकी आवाजात सांगतात मी दिलेले शब्द पूर्ण केले, मात्र तसे काहीही झालेले नाही. तसे त्यांनी एकही काम दाखवावे. त्यांनी मालिका, सिनेमे, नाटके खूप केली. मात्र मतदारसंघात त्यांनी गेल्या चार वर्षांत काय काम केले, असा प्रश्न मी मतदारसंघातील एक सामान्य नागरिक म्हणून विचारत आहे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT