<div class="paragraphs"><p>तुकाराम सुपे</p></div>

तुकाराम सुपे

 

सरकारनामा

पुणे

तुकाराम सुपेकडील घबाड संपता संपेना; जप्त केलेली रक्कम पावणेचार कोटींवर !

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Examination) गैरव्यवहाराचा संशयित मुख्य सूत्रधार परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) याच्याशी संबंधितांकडून पोलिसांनी आज आणखी ३३ लाख रूपये जप्त केले. जप्त केलेली एकुण रक्कम तीन कोटी ८८ लाखांवर पोचली आहे. शिवाय तब्बल ७० लाख रूपयांचे सोन्याचे दागिने याआधी जप्त करण्यात आली आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत आठजणांना अटक करण्यात आली असून यामध्ये परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे याचा समावेश आहे.दरम्यान, सुपे याच्याकडील चौकशीतून रोज नवी माहिती समोर येत असून त्यातून आज ३३ लाख रूपये सुपे याच्या जवळच्या लोकांकडून जप्त करण्यात आले.

दरम्यान, गेल्या महिन्यात २१ नोव्हेंबरला झालेल्या ‘टीईटी’ परीक्षेचा निकाल कधी लागणार याची चिंता विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे.या परीक्षेतही गैरप्रकार करण्यात आला असण्याचा संशय विद्यार्थी-पालक व्यक्त करू लागले आहेत.

या परीक्षेला राज्यातून सुमारे साडेतीन-चार लाख विद्यार्थी बसले होते.पहिली ते बारावीपर्यंतच्या सरकारी, सरकारी अनुदानीत तसेच खासगी विनाअनुदानीत शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी २०१३ पासून ही पात्रता परीक्षा घेण्यात येत आहे. दरम्यान, २०१८ व २०२० या दोन्ही परीक्षांमध्ये गैरप्रकार समोर आल्याने गेल्या महिन्यात २१ नोव्हेंबरला घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालाबाबत अनिश्‍चितता आहे.

२०२० व २०१८ या दोन वर्षात घेतलेल्या परीक्षांच्या गैरप्रकारात आतापर्यंत आठजणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सुखदेव डेरे व तुकाराम सुपे या परीक्षा परिषदेच्या दोन माजी आयुक्तांचा समावेश आहे.जीए सॉफ्टवेअर टेक्नालॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पहिल्यांदा २०१७ साली परीक्षेचे काम घेतले होते. त्यामुळे २०१७ साली झालेल्या परीक्षेबाबत शंका उपस्थित करण्यात येऊ लागली आहे.

‘टीईटी’ ही पात्रता परीक्षा २०१३ साली सुरू करण्यात आली.पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी ही पात्रता परीक्षा ठरविण्यात आली.२०१५ साली ही परीक्षा सरकारी, सरकारी अनुदानीत तसेच खासगी शाळांत शिक्षक होण्यासाठी सक्तीची करण्यात आली. त्यानुसार २०१६ साली परीक्षा झाली. मात्र, पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर जीए कंपनीकडे पहिल्यांदा परीक्षेचे काम देण्यात आले.२०२० साली घेतलेल्या टीईटी परीक्षांचा गैरप्रकार उजेडात आल्यानंतर या प्रकरणी सर्वप्रथम परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या तपासात २०१८ च्या परीक्षेतदेखील गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी आज सुखदेव डेरे यांनाही अटक करण्यात आली. त्यामुळे २०१७ परीक्षेबाबत संशय वाढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT