Kasba by-election Sarkarnama
पुणे

Kasba Peth Result : हक्काच्या प्रभागांमध्ये भाजपची निराशा; हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंनी घेतली इतकी मते

Ravindra Dhangekar News : कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर यांची निर्णायक आघाडी

सरकारनामा ब्यूरो

Kasba Peth Bypoll Election Result : पुण्यातील कसबापेठ पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत.

सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. तेव्हापासूनच काही फेऱ्या सोडता धंगेकर आघाडीवर आहेत. भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने यांना त्यांच्या वॉर्डामध्ये लिड मिळाले. मात्र, ते नाममात्र होते. त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये धंगेकर यांनी निर्णायक आघाडी घेतली. कसबा मतदारसंघात 13 व्या फेरीअखेर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना 123 मते मिळाली.

या निवडणुकीमध्ये भाजपने दिवगंत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी न देता, हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ब्राम्हण समाज नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यातून आनंद दवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्यांना किती मते मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, त्यांना आतापर्यंत फक्त 123 मते मिळाली आहेत.

कसब्यात १५वी फेरी अखेरीस महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर ५ हजार ५२० मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना ५० हजार मते पडली आहेत. काँग्रेसच्या वतीने कसबा मतदार संघात जल्लोष सुरु झाला आहे. तर अभिजीत बिचुकले यांना १३ मते मिळाली आहेत.

दरम्यान, चिंचवडमध्ये 12 फेरीअखेर अश्विनी जगताप यांनी मोठी आघाडी घेतली आहे. जगताप यांना 42 हजार 510 मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना 34 हजार 338 मते मिळाली आहेत. राहुल कलाटे यांना 13 हजार 117 मते मिळाली आहेत. कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुक भाजपने प्रतिष्ठेची केली होती.

एक जरी जागा महाविकास आघाडीला मिळाली तर हा भाजपसाठी मोठा धक्का असेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रचारात भाजपविरोधी वातावरण दिसल्याने महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT