Ajit Pawar, NCP Sarkarnama
पुणे

Pimpri News : पिंपरीत अजित पवारांना दुसरा धक्का; 'हा' नेता उतरणार विधानसभेच्या रिंगणात

Sachin Waghmare

Political News : राज्यातील विधानसभा निवडणुका येत्या काळात कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सध्या सुरु आहे. तोंडावर आलेल्या विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी जोरबैठका सुरु आहेत. त्यातच आता अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्येच आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

काही दिवसापूर्वी अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांच्यासह काही नगरसेवकांनी तुतारी हाती घेतली होती. त्यानंतर आता एक अजित पवार (Ajit Pawar) यांचा खंदा समर्थक असलेले ज्येष्ठ नगरसेवक विधानसभेची जोरदार तयारी करीत आहेत. आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत ते चिंचवड मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करीत असल्याचे समजते. (Pimpri News)

पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवारांचे खंदे समर्थक असलेले माजी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर हे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस सोडत चिंचवड विधानसभा निवडणूक लढणार आहेत. माझे सर्वच पक्षातील लोकांशी चांगले संबंध आहेत. माझ्यासोबत सर्वच पक्षातील जवळपास 30-40 नगरसेवक आहेत. त्यामुळे माझा मालक आता अजित पवार यांचा पक्ष नसून, माझा मालक आता पिंपरी चिंचवड शहरातील जनताच आहे, अशी भूमिका भोईर यांनी घेतली आहे.

येत्या काळात भोईर हे येत्या 2 ऑक्टोबरला महानिर्धार मेळावा घेऊन पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचा इशारा भाऊसाहेब भोईर यांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सांस्कृतिक जाण असलेले व्यक्तीमत्व अशी भाऊसाहेब भोईर यांची पिंपरी चिंचवड शहरात प्रतिमा आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या मेळाव्यात ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

भाऊसाहेब भोईर यांनी रविवारी पिंपरी चिंचवड शहरात घेतलेल्या पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील भ्रष्टाचार, घराणेशाही आणि दडपशाही विरोधात मी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे भोईर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT